Maharashtra cabinetportfolio allocation announced devendra fandnavis retain home ajit pawar finance and shinde urban development ministry
Marathi December 22, 2024 11:24 PM


नागपूर : मंत्रिमंडळ विस्तार तर झाला पण राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप कधी होणार, याची वाट सारेच बघत होते. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवारी) रात्री उशीरा किंवा उद्या सकाळी खातेवाटप जाहीर होऊ शकते, अशी माहिती अधिवेशनानंतरच्या पत्रकार परिषदेत दिली होती. महायुती सरकारचे खातेवाटप अंतिम झाल्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले होते. त्याप्रमाणेच अपेक्षेप्रमाणे शनिवारी रात्री 9 च्या सुमारास महायुती सरकारचे खातेवाटप जाहीर झाले. (maharashtra cabinetportfolio allocation announced devendra fandnavis retain home ajit pawar finance and shinde urban development ministry)

अपेक्षेप्रमाणे गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे. याशिवाय गृह, ऊर्जा, न्याय आणि विधी, सामान्य प्रशासन, तसेच खातेवाटप न झालेली सर्वच खाती फडणवीस यांच्याकडे आहेत. तर, नगरविकास मंत्रालय एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. याशिवाय गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम ही खाती देखील एकनाथ शिंदे यांना मिळाली आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थमंत्रालय कायम राखण्यात यश आले असून राज्य उत्पादन शुल्काची जबाबदारी देखील अजित पवार यांच्याकडेच आहे.

– Advertisement –

हेही वाचा – Ajit Pawar : दादा, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून टाका! मस्साजोगमध्ये अजित पवारांसमोर ग्रामस्थांची घोषणाबाजी

हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी 5 डिसेंबरला शपथ घेतली होती. त्यानंतर 15 डिसेंबरला हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला 39 आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. मात्र अजूनपर्यंत त्यांचं खातेवाटप झालं नव्हतं. महायुती सरकारचं खातेवाटप लवकर न झाल्यामुळे हे हिवाळी अधिवेशन बिनाखात्याच्या मंत्र्यांविना पार पडल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत होती.

– Advertisement –

मंत्रिमंडळाचे खातेवाटप पुढीलप्रमाणे

कॅबिनेट मंत्री

1. चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
2. राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा ( गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास)
3. हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
4. चंद्रकांत पाटील – उच्च – तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
5. गिरीश महाजन – आपत्ती व्यवस्थापन (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
6. गणेश नाईक – वनमंत्री
7. गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
8. दादाजी भुसे – शालेय शिक्षण
9. संजय राठोड – माती व पाणी परीक्षण
10. धनंजय मुंडे – अन्न – नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
11. मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
12. उदय सामंत – उद्योग आणि मराठी भाषा
13. जयकुमार रावल – विपणन, राजशिष्टाचार मंत्री
14. पंकजा मुंडे – पर्यावरण – वातावरण बदल, पशूसंवर्धन
15. अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नूतनीकरण
16. अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय
17. शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
18. आशिष शेलार – माहिती – तंत्रज्ञान, सांस्कृतिक
19. दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास, औकाफ मंत्रालय
20. अदिती तटकरे – महिला व बालविकास
21. शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम
22. माणिकराव कोकाटे – कृषी
23. जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज
24. नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
25. संजय सावकारे – वस्त्रोद्योग
26. संजय शिरसाट – सामाजिक न्याय
27. प्रताप सरनाईक – वाहतूक
28. भरत गोगावले – रोजगार हमी, फलोत्पादन
29. मकरंद पाटील – मदत आणि पुनर्वसन
30. नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
31. आकाश फुंडकर – कामगार
32. बाबासाहेब पाटील – सहकार
33. प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

राज्यमंत्री

34. आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, कृषी, मदत आणि पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार
35. माधुरी मिसाळ – नागरी विकास, वाहतूक, सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
36. पंकज भोयर – गृहनिर्माण, गृह (ग्रामीण), शालेय शिक्षण, सहकार, खाण
37. मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा – स्वच्छता, ऊर्जा, महिला आणि बालकल्याण
38. इंद्रनील नाईक – उद्योग, उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास, पर्यटन आणि माती – पाणी पुनर्वसन
39. योगेश कदम – गृह (शहर), महसूल, ग्रामीण विकास आणि पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अन्न आणि औषध प्रशासन


Edited by : Ashwini A. Bhatavdekar



Source link

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.