थंडीत वाढते सांधेदुखी, आराम वाटण्यासाठी या टिप्सचा वापर करा
GH News December 23, 2024 01:11 AM

हिवाळा सुरु झाला अनेक आजार डोके वर काढतात. जसे फ्लू, सर्दी आणि खोकला किंवा घसा खवखवतो. तसेच सांधेदुखीचा देखील त्रास सुरु होतो. थंडीत संधीवाताची समस्या असणाऱ्या ज्येष्ठांना अधिक त्रास होतो. त्यामुळे आपल्या जीवनशैलीत थोडा बदल करुन आपण या त्रासापासून वाचू शकतो. पाहा काय आहेत यावर उपाय….

आम्ही तुम्हाला असे सोपे उपाय सांगणार आहोत, ज्याने थंडीत बळावणाऱ्या सांधेदुखीतून तुम्हाला आराम मिळेल…

स्वत:ला उबदार ठेवा – सांध्यांना गरम ठेवल्याने स्नायू आखडणे आणि दुखणे कमी होते. गरम पाण्याचा शेक किंवा गरम कपडे घातल्याने स्नायू अधिक मजबूत होतात आणि रक्ताभिसरण वाढते. त्यामुळे सूज कमी होऊन आराम मिळते.

दररोज व्यायाम करा – दररोज जर व्यायाम केला तर सांध्याची लवचिकता वाढते. आणि स्नायू आखडण्याचे प्रमाण कमी होते.स्नायू मजबूत होऊन रक्ताभिसरण वाढते. त्यामुळे सूज कमी होते.

तेलाचा मसाज – संधीवाताने सांधे आखडतात. त्यामुळे चालताना विशेषत: जिने उतरताना आणि चढताना कळा येतात. त्यामुळे गरम तेलाने सांध्याची मालिश करावी. त्याने आखडलेले स्नायू मोकळे होतात आणि ब्लड सर्क्यूलेशन वाढते. तिळाच्या तेलात थोडी हळद टाकून मालिश केल्याने हळदीतील एंटी इंफ्लेमेटरी गुणाचा फायदा होतो.

हॉट एण्ड कोल्ड थेरपी – स्नायूंना आराम मिळावा आणि आखडलेपणा दूर करण्यासाठी हीट पॅकर्सचा वापर करु शकता. इंफ्लेमेशन आणि सूज कमी करण्यासाठी कोल्ड पॅकचा देखील वापर करु शकता.

हायड्रेट रहा – सांध्यात लुब्रिकेशन राहण्यासाठी तुम्हाला जादा पाणी पायला हवे.थंडीत लोक कमी पाणी पितात त्यामुळे सांध्यात दुखणे आणि सूज येण्याचा प्रकार सुरु होतो.त्यामुळे जास्त पाणी प्यावे.

ओमेगो- ३ फॅटी एसिड – सांध्यातील दुखणे आणि तसेच सांध्यात अवघडलेपणा दूर करण्यासाठी आहारात ओमेगा – ३ फॅटी एसिडचा समावेश करावा, त्यासाठी तुम्हाला माशाचे तेल,आळशीच्या बियांचा आहारात समावेश करावा लागेल.

हळद आणि आल्याचा चहा – हळद आणि आल्यात दोन्हीत पॉवरफूल इंफ्लेमेटरी गुण असतात. रोज एक कप हळद- आल्याचा चहा प्यायल्याने सूज कमी होते. सांध्यातील गतिशीलतेत सुधारणा होऊन सांधे दुखणे आणि आखडणे कमी होण्यास मदत होते.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.