Diljit Dosanjh : दिलजीत दोसांझ आणि एपी ढिल्लनमध्ये वादाचा सूर?
esakal December 23, 2024 01:45 AM

Bollywood Entertainment News : गायक दिलजीत दोसांझने अलीकडेच करण औजला आणि एपी ढिल्लन यांच्या इंदौर कॉन्सर्टदरम्यान भारतात त्यांच्या शोच्या लाँचिंगबद्दल भाष्य केले. मात्र, एपी ढिल्लनने चंदीगडमध्ये झालेल्या त्याच्या कॉन्सर्टमध्ये दिलजीतवर अप्रत्यक्षपणे टीका केली, जी काही वेळातच व्हायरल झाली. या घटनेमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली असून चाहते दोन गटांत विभागले आहेत.

इंदौरच्या कॉन्सर्टमध्ये दिलजीतने गंमतीने ‘दोन भावांचा’ उल्लेख केला होता, जो अनेकांच्या मते एपी ढिल्लन आणि करण औजला यांच्यासंदर्भात होता. या विधानावर चंदीगड कॉन्सर्टमध्ये एपी ढिल्लनने तीक्ष्ण उत्तर देत म्हटले, "आधी मला इन्स्टाग्रामवर अनब्लॉक करा आणि नंतर माझ्याशी बोला."

यावर दिलजीतने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर प्रतिक्रिया दिली. त्याने लिहिले, "मी तुला कधीही अनब्लॉक केले नाही, कारण मी तुला कधीही ब्लॉक केले नाही. माझ्या समस्या सरकारांशी असतील, कलाकारांशी नाहीत." या वक्तव्यानंतर दिलजीतने पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीतील एकतेवर भर दिल्याने चाहत्यांनी त्याचे कौतुक केले. मात्र, एपी ढिल्लनने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दिलजीत दोसांझचा 'दिल-लुमिनाटी टूर' २६ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममधून सुरू झाला. हा दौरा भारतातील दहा प्रमुख शहरांमधून जात असून २९ डिसेंबर रोजी गुवाहाटी येथे संपणार आहे. या वादातून हे दोन कलाकार एकत्र येऊन काम करतील की पंजाबी संगीताच्या या सुपरस्टार्समध्ये दरी निर्माण होईल, याची उत्सुकता चाहत्यांमध्ये वाढली आहे.

दिलजीतचा अखेरचा क्रू हा सिनेमा रिलीज झाला होता. तर अमरसिंह चमकीलामधील कामही खूप गाजलं होतं.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.