महिला अंडर-19 आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने रविवारी झालेल्या सामन्यात बांगलादेशचा पराभव केला. भारतीय संघाने अंतिम सामन्यात 41 धावांनी विजय मिळवला. आशिया चषकाचा अंतिम सामना मलेशियातील क्वालालंपूर येथे झाला.
बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 ओव्हर्समध्ये 7 विकेटच्या मोबदल्यात 117 धावा केल्या.
भारताकडून सलामीवीर गोंगाडी त्रिशा हिने सर्वाधिक 52 धावा केल्या. तर बांगलादेशकडून फरझाना अस्मिनने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.
118 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 18.3 षटकात 76 धावा करून सर्वबाद झाला. बांगलादेशच्या नऊ फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. बांगलादेशच्या जौरिया फिरदौसने (22) सर्वाधिक धावा केल्या.
भारताकडून आयुषी शुक्लाने तीन तर, पारुनिका सिसोदिया आणि सोनम यादवने प्रत्येकी दोन आणि व्हीजे जोशिताने एक विकेट घेतली. या स्पर्धेतील पाच सामन्यांपैकी एकही सामना भारतीय संघाने गमावला नाही.
BBC BBCया स्पर्धेत भारतीय अंडर-19 महिला क्रिकेट संघातील पाच खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे.
आशियाई क्रिकेट परिषदेने प्रथमच महिला अंडर-19 आशिया चषक स्पर्धेचं आयोजन केलं होतं.
गोंगाडी त्रिशाची धमाकेदार खेळीभारतीय संघाच्या विजयात गोंगडी त्रिशाच्या तुफानी फलंदाजीने महत्त्वाची भूमिका बजावली.
त्रिशाने 47 चेंडूत 52 धावा करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. यादरम्यान तिने चार चौकार आणि सहा षटकार खेचले.
गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताच्या विजयात त्रिशाचा महत्त्वाचा वाटा होता. त्रिशाची फलंदाजीची सरासरी 53 आहे.
मात्र, अ गटात पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात त्रिशा शून्यावर बाद झाली होती. त्यानंतर नेपाळविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात तिने नाबाद 17 धावा केल्या, बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात नाबाद 58, श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या सामन्यात 32 आणि अंतिम सामन्यात 52 धावा करून भारतीय संघाला आशियाचा चॅम्पियन बनवण्यात तिने महत्त्वाचं योगदान दिलं आहे.
ANI गोंगडी त्रिशाने भारताकडून सर्वाधिक धावा केल्या (फाइल फोटो) मिथिला विनोदअंतिम सामन्यात भारतीय फलंदाज मिथिला विनोदने 12 चेंडूत 17 धावा केल्या ज्यात तिने 2 चौकार आणि 1 षटकार लगावला. मिथिला विनोद ही मध्यमगती वेगवान गोलंदाज असून उजव्या हाताने फलंदाजी करते.
नेपाळविरुद्धच्या दुसऱ्या सामनात 19 वर्षांच्या मिथिलाने एक विकेट घेतली होती. मात्र, पावसामुळे हा सामना अनिर्णित राहिला होता.
तिसऱ्या सामन्यात तिने एक विकेट घेतली आणि श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या सामन्यात नाबाद 17 धावा केल्या.
AsianCricketCouncil/X आशिया कप विजेता भारतीय संघ आयुषी शुक्लाची धारदार गोलंदाजीभारतीय संघाच्या विजयात गोलंदाज आयुषी शुक्लानेही महत्त्वाची भूमिका बजावली. तिने तिच्या धारदार गोलंदाजीने बांगलादेशी महिला खेळाडूंना अजिबात वरचढ होऊ दिले नाही.
अंतिम सामन्यात तिने 3.3 ओव्हर्समध्ये 17 धावा देऊन तीन विकेट घेतल्या. आणि फलंदाजी करताना 10 धावाही केल्या.
AsianCricketCouncil/X विजयानंतर जल्लोष करताना भारतीय संघपहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात तिला फारसं यश मिळालं नसलं. तरी, बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात तिने चार ओव्हर्समध्ये 9 धावा देऊन तीन विकेट घेतल्या आणि चौथ्या सामन्यात चार विकेट्स घेतल्या.
ईएसपीएन क्रिकइन्फो वेबसाइटनुसार, 2007 मध्ये जन्मलेली आयुषी शुक्ला ही डावखुरी फलंदाज आहे आणि ती डाव्या हातानेच गोलंदाजी करते.
सोनम यादवआशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाज सोनम यादवने चार ओव्हर्समध्ये 13 धावा देऊन 2 विकेट घेतल्या. यापूर्वी 19 डिसेंबर रोजी झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यातही तिने दोन विकेट घेतल्या होत्या.
पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तिने चार ओव्हर्समध्ये फक्त सहा धावा देऊन चार विकेट घेतल्या होत्या. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव केला होता.
या विजयात सोनम यादवची महत्त्वाची भूमिका होती.
@BCCIWOMEN बीसीसीआयने एक्सवर पोस्ट करून संघाचं अभिनंदन केलं आहे जी कामिनीभारताची सलामीवीर फलंदाज जी कामिनीने पाकिस्तानसोबत खेळल्या गेलेल्या सामन्यात 44 नाबाद धावांची विजयी खेळी केली होती.
त्या सामन्यात तिने 29 बॉलमध्ये चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 44 धावा केल्या होत्या. भारताने त्या सामन्यात 9 विकेट राखून विजय मिळवला होता.
कामिनीने दुसऱ्या सामन्यात 8 धावा, तिसऱ्या सामन्यात शून्य धावा आणि चौथ्या सामन्यात 28 धावा केल्या.
16 वर्षीय कामिनी भारतीय संघाची यष्टिरक्षक आणि लेगब्रेक गोलंदाजही आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.