Elephanta Caves Facts : मुंबईतील गेट ऑफ इंडियाजवळ नीलकमल या प्रवासी बोटीला नैदलाच्या स्पीड बोटीने धडक दिल्याने मोठा अपघात झाला आणि या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला, तर 101 जणांना वाचवण्यात यश आले. या अपघाताने अवघा देश हळहळला. परंतु या अपघातादरम्यान एलिफंटा बेटाचं नाव चर्चेत आलं. कारण नीलकमल ही प्रवासी बोट एलिफंटाच्या दिशेने जात असतानाच तिचा अपघात झाला. मुंबई जवळच्या या बेटाचं नाव एलिफंटा कसं पडलं हे आम्ही येथे सांगत आहोत.
घारापुरी येथे आहे आहे एलिफंटा लेणी
बुधवारी मुंबईतील गेट वे ऑफ इंडियावरुन एलिफंटा बेटावर जाणाऱ्या नीलकमल बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने जोरात धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की नीलकमल बोटीला भगदाड पडलं आणि अख्खी बोट पाण्यात बुडाली. या बोटीतून 110 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. ही बोट एलिफंटा लेणीच्या दिशेने जात होती. मुंबई जवळच्या घारापुरी बेटावर प्रसिद्ध लेणी आहे. या ठिकाणी दररोज शेकडो प्रवाशी भेट देतात. मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथे दररोज अनेक बोटी प्रवाशांना घेऊन घारापुरी येथे जातात आणि सायंकाळी परत येतात. या बेटावरील लेणी अतिशय प्रसिद्ध आहे. या लेण्या पाहण्यासाठी देश विदेशातील पर्यटक येथे भेट देतात. घारापुरी बेटावरील या लेण्यांमुळे या बेटाला एलिफंटा हे नाव पडले. पण हेच नाव कसं पडलं? यामागे अतिशय खास कारण आहे.
प्रेक्षणीय आणि आश्चर्यचकीत करणाऱ्या लेण्या
भारताला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. यात माहाराष्ट्र देखील मागे नाही. महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध लेण्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील अजिंठा आणि वेरूळ या लेण्या तर जगप्रसिद्द आहेत. अशीच एक ऐतिहासिक लेणी मुंबईजवळच्या घारापुरी बेटावर आहे. या लेण्या अतिशय प्रेक्षणीय आणि आश्चर्यचकीत करणाऱ्या आहेत. या लेण्यांना एलिफंटा लेणी असे म्हटले जाते. मुंबईपासून 10 किलोमीटर अंतरावर बंदराच्या पूर्व किनाऱ्यावर असलेल्या घारापुरी येथे ही एलिफंटा लेणी आहे.
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश
एलिफंटा बेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई हार्बरमधील गेटवे ऑफ इंडियाच्या ईशान्येकडील घारापुरीवरील खडक कापलेली मंदिरे. डोंगरमाथ्यावर वसलेल्या एलिफंटा लेण्यांचा 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला होता. हे ठिकाण सुट्टीच्या दिवशी भेट देण्यासाठी, ट्रेकिंगसाठी आणि पिकनिकसाठी अतिशय खास आहे. या लेण्यांच्या बांधकामाच्या तारखेबद्दल नेहमीच शंका व्यक्त केल्या जातात. परंतु 450 ते 750 AD च्या दरम्यान बांधले गेले असे मानले जाते. या गुहा मंदिरांचे चक्रव्यूह भारतातील काही सर्वात प्रभावी मंदिरांचे प्रतिनिधित्व करते.
बेटाला एलिफंटा हे नाव कसं पडलं?
घारापुरी बेटावरीली ही लेणी 2200 वर्षे जुनी असून भव्य गुफा मंदिरे आणि हिंदू देवी-देवतांच्या शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे.या बेटावरील हत्तीचे एक दगडी शिल्पावरून या लेणीला एलिफंटा लेणी असे म्हटले जाऊ लागले. या बेटावरील एका शिल्पाचा आकार हत्तीसारखा आहे. या हत्तीच्या आकाराच्या शिल्पामुळे पोर्तुगीजांनी या लेणीचे नाव एलिफंटा असे ठेवले. हे हत्तीचे शिल्प आता भायखळा येथील जिजामाता उद्यानात ठेवण्यात आले आहे. सध्या हे हत्तीचे शिल्प भाऊ दाजी लाड संग्रहालयात ठेवलेली आहे. युनेस्कोने 1987 मध्ये एलिफंटा लेणी जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले. एलिफंटा गुंफाचे जतन आणि संवर्धनाचे काम भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग यांच्याकडून केले जाते.
एलिफंटा लेणीत एकूण सात गुहा
एलिफंटा लेणीत एकूण सात गुहा आहेत. आठव्या शतकाच्या सुमारास राष्ट्रकूट राजांनी या लेण्यांचा शोध लावल्याचे मानले जाते. येथील मुख्य गुहेत एकूण 26 खांब असून त्यावर भगवान शिवाचे अनेक रुपं कोरलेली आहेत. यापैकी त्रिमूर्ती ही सर्वात आकर्षक लेणी आहे. यात शिवप्रभूंची तीन रूपे दाखवण्यात आली आहेत. एलिफंटा बेटावर गन हिल आणि स्तूपा हिल या दोन मुख्य टेकड्या आहेत. गन हिलचे नाव तेथे असलेल्या दोन ब्रिटीशकालीन तोफांवरून ठेवले आहे, तर स्तूप हिलचे नाव उत्खननादरम्यान सापडलेल्या बौद्ध स्तूपाच्या अवशेषांवरून ठेवले आहे.