Sky Force Trailer Release : अक्षय कुमारच्या स्काय फोर्सचे ट्रेलर झाले रिलीज; अॅक्शन, इमोशन पाहून चाहत्यांची वाढली उत्सुकता
Mensxp January 07, 2025 10:45 AM

Sky Force Trailer Release : 

अक्षय कुमारचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'स्काय फोर्स'चा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. दिनेश विजानच्या मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटात अक्षय कुमारसोबत वीर पहाडिया, सारा अली खान आणि अभिनेत्री निम्रत कौर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमात अक्षय कुमार एअरफोर्स ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. 

या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात आकाशात उडणाऱ्या लढाऊ विमानाने होते, त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी लष्कर म्हणत आहे की, 'भारत सरकारला त्यांनी कोणाला आव्हान दिलंय ये माहिती नाहीये.' यानंतर अक्षय कुमार आणि वीर पहाडिया रणांगणात पाकिस्तानी लष्कराशी लढताना दिसत आहेत. 

हेही वाचा : Spanish Women Search Of Mother : स्पॅनिश महिला २० वर्षापूर्वी टाकून दिलेल्या जन्मदात्या आईच्या शोधात आली भारतात

ट्रेलरमध्ये अक्षय कुमार पुढे म्हणतो, 'पाकिस्तानला सांगावे लागेल की आम्ही घरात घुसूनही मारू शकतो. 'स्कोई फोर्स'मधील अप्रतिम ॲक्शन सीन्स पाहिल्यानंतर लोकांची चित्रपटाविषयी उत्कंठा वाढली आहे..

'स्काय फोर्स' पहिल्या हवाई हल्ल्यावर आधारित 

Instagram

अक्षय कुमार आणि वीर पहाडिया यांचा 'स्काय फोर्स' हा चित्रपट भारताने केलेल्या पाकिस्तानमधील पहिल्या हवाई हल्ल्यावर आधारित आहे. वीर पहाडिया या चित्रपटातून पदार्पण करत असून, या चित्रपटात सारा अली खान वीरच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. या ट्रेलरमध्ये, एअर स्ट्राइक दरम्यान वीर पाकिस्तानमध्ये अडकल्याचे दिसत आहे, त्यानंतर अक्षय त्याला पाकिस्तानमधून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. या चित्रपटात अभिनेत्री निम्रत कौर अक्षयच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. ट्रेलरमधील 'ए मेरे वतन के लोगों' हे गाणे ऐकून लोकांचे डोळे नक्कीच पाणावतील.

View this post on Instagram

हेही वाचा : HMPV Cases in India : चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या HMPV चा पहिला रूग्ण कर्नाटकात तर दुसरा सापडला गुजरातमध्ये; काय आहेत या व्हायरसची लक्षणे?

प्रजासत्ताक दिनी होणार रिलीज 

Instagram

अक्षय कुमार आणि वीर पहाडिया स्टारर चित्रपट 'स्काय फोर्स' प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 24 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे, हा चित्रपट संदीप केवलानी आणि अभिषेक कपूर यांनी केला आहे. अक्षय कुमारचा मागील चित्रपट 'सराफिरा' बॉक्स ऑफिसवर खराब फ्लॉप झाल्याने निर्मात्यांना या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.


© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.