अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) हिने आजपर्यंत अनेक मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत. सध्या तिची स्टार प्रवाह या चॅनलवर प्रेमाची गोष्ट ही मालिका चालू आहे. या मालिकेतील ती मुक्ता हे पात्र साकारत आहे. तिने तिच्या या पात्राला खूप चांगला न्याय दिलेला आहे. तसेच प्रेक्षकांना देखील तिची ही भूमिका खूप आवडलेली आहे. परंतु आता तेजश्री प्रधानने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. ज्यामुळे तिच्या चाहत्यांना नक्कीच धक्का बसू शकतो. तो म्हणजे आता तेजश्री प्रधान प्रेमाची गोष्ट ही मालिका सोडणार आहे.
खात्रीशीर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तेजस्वी प्रधान प्रेमाची गोष्ट ही मालिका सोडणार आहे. प्रेमाची गोष्ट या मालिकेतील मुक्ता आणि सागरची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडते. ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत देखील उच्च स्थानी आहे. तरी देखील तेजश्रीने ही मालिका सोडण्याचा निर्णय का घेतला आहे? याचे कारण अजूनही समोर आलेले नाही.
हाती आलेल्या माहितीनुसार आता प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये मुक्ताच्या भूमिकेत अभिनेत्री स्वरदा ठिगळे दिसणार आहे. स्वरदाने माझे मन तुझे झाले स्वराज्य सौदामिनी ताराराणी यांसारख्या मालिकांमध्ये काम केलेले आहे. आणि लवकरच प्रेमाची गोष्ट मालिकेच्या शूटिंगला देखील सुरुवात करणार आहे. तिने 2013 साली माझे मन तुझे झाले या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ती हिंदी मालिकेत देखील झळकली.
तिने सावित्री देवी कॉलेज आहे हिंदी मालिकेत देखील काम केलेले आहे. त्यानंतर तिने प्यार के पापड या मालिकेत काम केले आहे. या दोन हिंदी मालिकांनंतर तिने पुन्हा एकदा मराठी मालिका काम केले. तिने स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेमध्ये ताराराणी यांची भूमिका अत्यंत चांगल्या पद्धतीने साकारली. यासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. परंतु आता ती प्रेमाची गोष्ट या मालिकेतील मुक्ता ही भूमिका कशी साकारते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
सानिका मोजार हिचे नादखुळा फोटो; सोशल मीडियावर चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
भावासाठी एक चित्रपट केला आणि त्याच चित्रपटाने करियर संपवले; आमीर खानच्या ‘मेला’ला आज २५ वर्षे झाली…