Maharashtra News Live Updates: अमरावतीच्या भाजीपाला मार्केटमध्ये हिरव्या भाजीपाल्याचे ठोक दर घसरले
Saam TV January 07, 2025 09:45 AM
Amravati News: अमरावतीच्या भाजीपाला मार्केटमध्ये हिरव्या भाजीपाल्याचे ठोक दर घसरले

अमरावतीच्या भाजीपाला मार्केटमध्ये हिरव्या भाजीपाल्याचे ठोक दर घसरले

वांगे ,पालक ,टमाटर कोथिंबीर ,गोबी फक्त दहा रुपये किलोवर

भाव घसरल्याने शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही निघेना

बाजारपेठेमध्ये आवक वाढल्याने भाजीपाल्याचे भाव घसरले

Beed News: वाल्मीक कराडसोबत फोटो काढणे आले अंगलट, API महेश विघ्ने यांची उचलबांगडी

बीड - वाल्मीक कराडसोबत फोटो काढणे आले अंगलट

जितेंद्र आव्हाड यांच्या अक्षेपानंतर उचलबांगडी

API महेश विघ्ने यांच्यासह दोघांना sit तून बाजूला सारले

API महेश विघ्ने यांचा वाल्मीक कराडसोबत होता फोटो

हवलादार मनोज वाघ यांनाही बाजूला सारले

Pune News: पुण्याच्या भोर तालुक्यातल्या दुर्गम वाकांबे जिल्हा परिषद शाळेच्या भिंती झाल्या बोलक्या

पुण्याच्या भोर तालुक्यातल्या दुर्गम वाकांबे जिल्हा परिषद शाळेच्या भिंती झाल्या बोलक्या

ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दलची जिज्ञासा आणि आवड निर्माण व्हावी यासाठी, सायबेजआशा संस्थेच्या ३५ उत्साही अभियंत्यांनी सुट्टीच्या दिवशी रंगरंगोटी उपक्रम राबवत, स्वतः ब्रश हातात घेत रंगवल्या शाळेच्या भिंती

शाळेच्या भिंतींवर विज्ञान, गणित आणि सामान्य ज्ञान यावर आधारित रंगीत आणि शैक्षणिक अशी रेखाटली चित्रे

मूल्यशिक्षण आणि अभ्यासक्रमावर आधारित थीम्स वापरून आकर्षक पद्धतीने रंगवल्या भिंतीं

शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांनीही उपक्रमात उत्स्फूर्तपणे घेतला सहभाग

Pune News: पुण्यातील भोरमध्ये चारा घेऊन जाणाऱ्या टेम्पोला आग

पुण्यातील भोरमध्ये चारा घेऊन जाणाऱ्या टेम्पोला आग

पुण्यातील भोर तालुक्यातल्या सांगवीतील घोरेपडळ गावातील घटना

जनावरांचा चारा घेऊन जाणाऱ्या टेम्पोला विजेच्या तारांचे घर्षन झाल्याने लागली आग

चारा जळून खाक झाल्यानं शेतकऱ्याचे मोठे नुकसान

Nashik News: त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने 10 जणांना घेतला चावा

- त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने 10 जणांना घेतला चावा

- मंदिराच्या दर्शन रांगेतील रविवारी संध्याकाळची घटना

- यामध्ये पाच मुलांसह शालेय मुलाचा समावेश

- जखमींवर त्र्यंबकेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले उपचार

Nagpur News: नागपूर पुन्हा गारठा, पारा 8.8 अंशावर

- नागपूरात गारठा कायम पारा पुन्हा 8.8 अंशावर

- दिवसा ऊन तर रात्री हुडहुडी भरणारी थंडी

- पुढील 8 दिवस थंडी कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज

- उत्तर भारतातील हिम वृष्टीचा परिणाम विदर्भावर, विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील पारा 10 अंशाच्या खाली

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.