नागपूर : राज्य सरकारने महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्याचे उदिष्ट्य ठेवलेले आहे. त्यासाठी विदर्भ आणि राज्यातील शेती उत्पादकांचा व्यापार आणि आयात-निर्यात वाढवावी लागेल.
पंधरा दिवसांतून एकदा नागपुरात येऊन येथील जनतेचे प्रश्न ऐकून घेणार आहे, अशी घोषणा पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी येथे केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या आदेशानुसार नागपुरात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने ईसीजीसी लिमिटेडच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निर्यातदार-आयातदार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मंत्री धनंजय मुंडे, एसजीएसटीचे अतिरिक्त संचालक स्नेहल ढोके, उपायुक्त सदाशिव कुलकर्णी, अतिरिक्त आयुक्त तेजराव पाचर्णे, चेंबरचे अध्यक्ष अर्जुनदास आहुजा, उपाध्यक्ष स्वप्नील अहिरकर, सचिव सचिन पुनियानी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहिरकर, शहराध्यक्ष प्रशांत पवार, शाखा व्यवस्थापक संतोष विश्नोई, विश्व ॲग्रोमेड प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक शांतनू पुराणिक, अनुराग पुराणिक उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, त्यांच्या पक्षाने दिले आहेत. ते पुढे म्हणाले की, आजोबा कै.वसंतराव नाईक नेहमी म्हणायचे की, प्रत्येकाने आपल्या कामात प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता ठेवावी. निष्ठेने आणि बांधिलकीने आम्ही जनता आणि सरकार यांच्यात सेतू म्हणून काम करू आणि जनतेच्या आणि व्यावसायिकांच्या समस्या महाराष्ट्र सरकारसमोर मांडून सोडवण्यासाठी पूर्ण सहकार्य करू असे आश्वासन दिले.
विदर्भातील व्यापार आणि आयात-निर्यात वाढवण्यासाठी सरकारकडून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू असेही ते म्हणाले. चेंबरचे अध्यक्ष अर्जुनदास आहुजा यांनी अध्यक्षीय भाषणात चेंबरची माहिती दिली. एलबीटीचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा आणि हा विभाग बंद करावा. एलबीटीचा अहवाल चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी इंद्रनील नाईक यांना दिला. यावेळी चेंबरचे माजी अध्यक्ष डॉ.दीपेन अग्रवाल यांचे भाषण झाले.