Defence PSU कंपनीकडून मोठी अपडेट; 2 युद्धनौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द, शेअर्सने दिलाय मल्टीबॅगर परतावा
मुंबई : शेअर बाजाराची सुरूवात आज सकारात्मक झाली असून त्यात अनेक कंपन्यांचे शेअर्स त्यांच्या घडामोडींमुळे चर्चेत आहेत. सार्वजनिक नवरत्न दर्जाची कंपनी माझगाव डॉक शिपबिल्डर्सने मोठे अपडेट दिले आहे. Mazagon Dock Shipbuilders (MDL) ने सांगितले की त्यांनी प्रोजेक्ट 17A क्लासचे पहिले स्टेल्थ फ्रिगेट आणि प्रोजेक्ट 15B क्लासचे चौथे Stealth destroyer भारतीय नौदलाकडे सुपूर्द केले आहेत. अशी माहिती कंपनीने शेअर बाजारांना दिली आहे. शुक्रवारी, सरंक्षण क्षेत्रातील हा सार्वजनिक शेअर 6.22 टक्क्यांच्या च्या घसरणीसह 4725.55 रुपयांवर बंद झाला. 2 युद्धनौका नौदलाला सुपूर्ददोन्ही युद्धनौकांची रचना भारतीय नौदलाच्या 'युद्धनौका डिझाईन ब्युरो'ने केली आहे आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स (MDL) ने बांधली आहे, अशी माहिती कंपनीने शेअर बाजारांना दिली. प्रोजेक्ट 17A चे फर्स्ट क्लास (FoC) जहाज निलगिरी हे अत्याधुनिक प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असून जगातील कोणत्याही त्यांच्या श्रेणीतील सर्वोत्तम जहाजांच्या बरोबरीने आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्सने म्हटले की युद्धनौका विविध शस्त्रे आणि सेन्सर्सने सुसज्ज आहे. शत्रूच्या पाणबुड्या, पृष्ठभागावरील युद्धनौका, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमानांवर अष्टपैलू हल्ला करण्याची क्षमता आहे. निलगिरीची रचना कोणत्याही सपोर्ट शिपशिवाय स्वतंत्रपणे चालवता येईल आणि नौदल टास्क फोर्सचे प्रमुख जहाज म्हणून काम करू शकेल. युद्धनौकेचे वैशिष्टसुरत हे प्रोजेक्ट 15B चे चौथे जहाज आहे आणि सागरी युद्धाच्या संपूर्ण स्पेक्ट्रममध्ये विविध प्रकारची कार्ये आणि मोहिमा पार पाडण्यास सक्षम असलेले शक्तिशाली व्यासपीठ आहे. हे सुपरसॉनिक जमीनीवरून जमिनीवर मारा करणारी ब्राह्मोस क्षेपणास्त्रे आणि मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या बराक-8 क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे. डिस्ट्रॉयर स्वदेशी विकसित पाणबुडीविरोधी शस्त्रे आणि सेन्सर्सने सुसज्ज आहे, ज्यात प्रामुख्याने हल माउंटेड सोनार हम्सा एनजी, हेवी ड्यूटी टॉर्पेडो ट्यूब लाँचर्स आणि पाण्याखालील युद्धासाठी ASW रॉकेट लाँचर्स आहेत.Mazagon Dock Shipbuilders त्याच्या ग्राहकांसाठी जहाजे, पाणबुड्या, विविध प्रकारची जहाजे आणि संबंधित अभियांत्रिकी उत्पादनांचे बांधकाम आणि दुरुस्ती करण्यात गुंतलेली आहे. MDL नेहमीच देशाच्या प्रगतीशील स्वदेशी युद्धनौका आणि पाणबुडी निर्माण कार्यक्रमात आघाडीवर आहे. लिअँडर आणि गोदावरी क्लास फ्रिगेट्स, खुकरी क्लास कॉर्वेट्स, मिसाईल बोट्स, दिल्ली आणि कोलकाता क्लास डिस्ट्रॉयर्स, शिवालिक क्लास स्टेल्थ फ्रिगेट्स, विशाखापट्टणम क्लास डिस्ट्रोअर्स, निलगिरी क्लास फ्रिगेट्स, एसएसके पाणबुड्या आणि स्कॉर्पीन पाणबुड्या तयार केल्या आहेत. शेअर्सने एका वर्षात दिला दुप्पट परतावामाझगाव डॉक शिपबिल्डर्सच्या शेअर्सने या वर्षी गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला असून 2024 मध्ये आतापर्यंत हा शेअर 107 टक्क्यांनी वाढला आहे. तर गेल्या एका वर्षात शेअरने 131 टक्के, 2 वर्षांत 438 टक्के आणि 3 वर्षांत 1820 टक्क्यांचा परतावा दिला आहे. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 5,859.95 रुपये आणि 52 आठवड्यांचा नीचांक 1,797.10 रुपये आहे.