Merry Christmas 2024 : कुठे छतावर झाडू लपवतात तर कुठे हलवा फेकतात, अजब आहेत नाताळच्या जगभरातील पंरपरा
esakal December 23, 2024 08:45 PM
Merry Christmas 2024 :  

नाताळ हा जगभरात मोठ्या उत्सहात पार पडतो. भारतात जसे दिवाळी मोठा सण आहे तसा परदेशातील अनेक छोट्या,मोठ्या देशात नाताळ साजरा केला जातो. या दिवशी येशू ख्रिस्तांची प्रार्थना करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. तसेच, एकमेकांच्या घरी पार्टीचे आयोजनही केले जाते.

लहान मुलांसाठी तर हा दिवस म्हणजे गिफ्ट मिळण्याचा दिवस होय. एखादा सण जेव्हा पूर्वापार साजरा केला जातो. तेव्हा त्याच्याशी संबंधित काही महत्त्वाच्या घटना, परंपराही जोड्ल्या जातात. आणि पिढ्या बदलतील तसे सण साजरा करण्याची पद्धतीही दृढ होत जाते. आज आपण जगभरात नाताळ साजरा करण्याच्या काही वेगळ्या पद्धती जाणून घेणार आहोत.  

या देशात नाताळ उन्हाळ्यात साजरा केला जातो (Global celebrations of Christmas)

ऑस्ट्रेलियात ख्रिसमस उन्हाळ्यात साजरा केला जातो. उन्हाळ्याच्या उत्सवामुळे, येथील सांताक्लॉज आपला पारंपारिक पोशाख परिधान न करता इतर पोषाख घालतात. तर पारंपरिक रेनडिअरला विश्रांती देऊन त्या ऐवजी सहा कांगारू गाडी ओढतात. तसेच, नाताळसाठी उन्हाळी कपडे, खाद्यपदार्थ बनवले जातात. विशेष म्हणजे इथे नाताळसाठी खास स्नोमॅन बनवला जात नाही.

स्लोव्हाकिया (Christmas Traditions)

या देशात ख्रिसमस साजरा करण्याची जगावेगळी पद्धत आहे. या दिवशी खास ‘लोक्सा हलवा’ बनवला जातो. घरातील सर्वात वयोवृद्ध सदस्य त्या हलव्याचा थोडासा भाग टेरेसवर टाकतो. यानंतर घरातील ज्येष्ठ सदस्य म्हणजेच आई-वडील हा हलवा खातात. हा हलवा मुलांसाठी खास आहे. हा हलवा चुलीवर बनवला जातो.

अर्जेंटीना (Christmas around the world)

अर्जेंटीनामध्ये नाताळ हटके पद्धतीने साजरा केला जातो. आपल्याकडे दिवाळीला दिवे लावतो, उत्सव साजरा करतो. तसे या देशात नाताळदिवशी सायंकाळी आकाशात दिवे सोडले जातात. या दिवशी, ते कागदापासून एक प्रकारचे ग्लोब तयार करतात आणि त्यात दिवे ठेवलेले असतात. ते दिवे पेटवले की कंदील आकाशाकडे सोडतात. लोक सहसा रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहतात आणि आकाशात पसरलेल्या दिव्यांचा आनंद घेतात.

इंग्लंड (Christmas Celebrations in different countries)

इंग्लंडमध्ये नाताळ इतर देशांसारखाच मिठाई, पार्टी, सेलिब्रेशन करून साजरा केला जातो. पण लहान मुलांसाठी एक शिक्षा दिली जाते. जर या दिवशी लहान मुले जास्त दंगा करायला लागली, दमवायला लागली तर त्यांना मिठाई, गोड पदार्थ दिले जात नाहीत. उलट त्यांना कोळसे खायला दिले जातात. नाताळची ही अनोखी प्रथा आता तिथे दृढ झाली आहे.

कॅनडा (The cultural significance of Christmas)

सर्व देशात कॅनडा हा देश नाताळ जरा जास्त उत्सवात अन् वेगळ्या पद्धतीने साजरा करतो. कारण, नाताळदिवशी मुलांना गिफ्ट वाटणारा सॅन्ताक्लॉज कॅनडामध्येच राहतो असे म्हटले जाते. त्यामुळे इथले लोक सॅन्ताला ‘आमच्या घरी नाताळसाठी ये, आम्ही तुझे स्वागत करू’ असे सांगणारे पत्र लिहीतात.

कोळ्याच्या जाळ्याच झाड (Uniue Christmas Celebration Themes In the world)

युक्रेन देशात ख्रिसमस ट्री हे खरे आणत नाहीत. तर ते घरी बनवले जाते. विशेष म्हणजे हे ख्रिसमसचे झाड कोळ्यांच्या जाळ्यापासून बनवले जाते. कोळ्याच्या जाळ्यांचे झाड दिसायला युनिक असते. यामागे अशी कथा सांगितली जाते की, एका गरीब महिलेला खरे झाड घेण्यासाठी पैसे नव्हते. तेव्हा ती निराश होऊन झोपी गेली. तेव्हा तिच्या दारात कोळ्यांनी एका काठीचा आधार घेऊन ख्रिसमस ट्री विणले. बर्फाच्छदित कोळ्याच्या जाळ्यावर जेव्हा सुर्याची किरणे पडली तेव्हा ते चमकायला लागले. त्यामुळे तेव्हापासून इथे कोळ्यांचे जाळे असलेले झाड बनवतात. तसेच, ख्रिसमस ट्री सजवल्यानंतर त्यावर जर कोळ्यांनी एखादं जाळ विनलं तर ते शुभ मानलं जातं.

नॉर्वे (Merry Christmas 2024)

या देशात ख्रिसमसदिवशी घरातील झाडू, मॉप अशा वस्तू लपवून ठेवल्या जातात. कारण, या वस्तूंंच्या मार्फत पृथ्वीवर वाईट शक्ती येऊ नये, अशी भावना लोकांची असते. आपण चित्रपट,कार्टूनमध्ये पाहतो की चेटकीन झाडूवरून येते. तोच विचार हे लोक करतात. त्यामुळे लोक इथे झाडू लपवतात.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.