राहाता तालुक्यातील पुणतांबा गावातील धार्मिक स्थळी तोडफोड झाल्याचा प्रकार समोर आला. आठ दिवसापूर्वी अशीच धार्मिक स्थळातील मूर्तींची बिटंबना झाली होती. त्यात एकाला पोलिसांनी अटक केली होती. पण आता पुन्हा एकदा धार्मिक स्थळात तोडफोड झाल्याने गावात तणावाचे वातावरण आहे. आरोपीच्या अटकेसाठी गावकरी एकवटले असून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. गाव बंद ठेवत गावकऱ्यांकडून रास्ता रोको आंदोलन करत आरोपीच्या अटकेची मागणी केली. यावेळी राहाता पोलिसांनी गावात बंदोबस्त वाढवला आहे.
Nanded Crime Update : नांदेड जिल्ह्यातील 40 जण हद्दपार, तर 12 जण तुरुंगातनांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी नांदेड पोलिसांनी "ऑपरेशन फ्लश आऊट' ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेतून अनेक गुन्हेगारांवर कारवाई झाली आहे. मागील वर्षभरात 13 टोळ्यातील 40 जणांना जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्यात आले, असून 12 जणांना एमपीडीए कायद्याअंतर्गत एका वर्षासाठी तुरुंगात टाकण्यात आले आहे. त्याच बरोबर 230 जणांवर विविध गुन्ह्यांनुसार कारवाईसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.
Rahul Gandhi : राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर; सूर्यवंशी, वाकोडे कुटुंबियांची भेट घेणारलोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर येत आहेत. नांदेडहून कारने ते परभणीला दुपारी दोन वाजता रवाना होतील. संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर उसळलेल्या हिंसाचारावेळी अटक करण्यात आलेले सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. राहुल गांधी त्यांच्या कुटुंबियांना भेटणार आहे. तसेच राहुल गांधी आंबेडकरी चळवळीतील नेते दिवंगत विजय वाकोडे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेणार आहेत.
Mahayuti Guardian Minister Appointment : पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच, तर मंत्रालयातील दालनावरून रुसवेफुगवेनिकालानंतर सुमारे महिन्याभरानंतर मंत्रिमंडळ खातेवाटप झाले. आता महायुतीमध्ये पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू आहे. तिन्ही पक्षांचे अनेक नेते मंत्री झाल्यामुळे त्यांनी पालकमंत्रीपदावर दावा केला आहे. त्यामुळे मंत्रालयातील दालनांवरून रुसवेफुगवे होऊ लागले आहेत.