नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कथित अपमानावरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संसदेतील भाषणामधील एका वक्तव्यावर काँग्रेस, आम आदमी पार्टी, बसपा आणि सपा यांच्यासह अनेक राजकीय पक्ष आक्रमक आहेत. अमित शहा यांनी माफी मागावी असे विरोधकांचे म्हणणे आहे. आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्याला प्रचाराचा भाग बनवले आहे. तर दुसरीकडे काँग्रेस देशभर आंदोलन करणार आहे. अशातच आता भाजपाही देशभर आंदोलन करून काँग्रेसला प्रत्युत्तर देणरा आहे. (BJP will protest across the country for continuously insulting Dr. Babasaheb Ambedkar and expose the true face of Congress)
भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत घेत काँग्रेसचा खरा चेहरा जनतेसमोर आणणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले की, बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वाधिक अपमान काँग्रेसनेच केला आहे. जवाहरलाल नेहरूंनी त्यांचा (आंबेडकरांचा) निवडणुकीत पराभव करण्यासाठी प्रयत्न केला होता आणि विरोधात प्रचार करण्यासाठी मैदानात उतरले होते. 1952 च्या निवडणुकीत आंबेडकर मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून पराभूत झाले होते आणि त्यांच्या विरोधात असलेले नारायण सदोबा काजरोळकर हे विजयी झाले होते. निवडणुकीत विजयी झालेल्या नारायण सदोबा काजरोळकर यांना 1970 मध्ये काँग्रेस सरकारने पद्मभूषण सारखा देशातील तिसरा सर्वोच्च सन्मान दिला होता, अशी माहिती प्रसाद यांनी दिली.
– Advertisement –
हेही वाचा – Udan Yatri Cafe : विमानतळावर महागड्या वस्तूंचे दर होणार कमी; कसे ते जाणून घ्या…
रविशंकर प्रसाद म्हणाले की, काँग्रेसचे नेतृत्व करणारे संपूर्ण नेहरू-गांधी घराणे कायम स्वत:साठी भारतरत्न घेत राहिले. पण त्यांनी भीमराव आंबेडकरांचा कधीही सन्मान केला नाही. मात्र निवडणुकीत आंबेडकरांचा पराभव करणाऱ्या नारायण सदोबा काजरोळकर यांना काँग्रेसकडून पद्मभूषण देण्यात आले. भीमराव आंबेडकरांचा यापेक्षा मोठा अपमान असूच शकत नाही. आमच्याकडे संपूर्ण कागदपत्रे आहेत आणि काँग्रेस बाबासाहेबांचा कशा पद्धतीने अपमान करत आहे, हे आम्ही देशभरातील लोकांना सांगू, अशा इशारा रविशंकर प्रसाद यांनी दिला. त्यांनी असाही दावा केला की, अमित शहा यांच्या भाषणाचा काही भाग कापून पसरवला जात आहे. वस्तुस्थितीपेक्षा काही तरी वेगळा अपप्रचार काँग्रेसकडून केला जात आहे. त्यामुळे आम्ही काँग्रेसला याचे उत्तर देऊ आणि देशभर मोहीम राबवून काँग्रेसची आंबेडकरविरोधी विचारसरणी उघड करू, असेही रविशंकर प्रसाद म्हणाले.
– Advertisement –
हेही वाचा – Government scheme : सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ! काय आहे नेमका प्रकार?
Edited By Rohit Patil