Pushpa 2 Stampede : 'पुष्पा 2'च्या प्रीमियरच्या वेळी 4 डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. हैदराबाद पोलिसांनी तपासासंदर्भात तेलगू अभिनेता अल्लू अर्जुनची मंगळवारी 24 डिसेंबर रोजी चार तास चौकशी केली. आता या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे त्याठिकाणी झालेल्या गोंधळाचा अंदाज बांधता येत आहे.
चा पुष्पा २ चित्रपट चांगलाच चर्चेत आहे आणि यासोबत या चित्रपटाशी जोडलेल्या प्रकरणाबद्दल देखील मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. एकीकडे चाहते अल्लू अर्जुनचा दोष नसल्याचे बोलत आहेत तर एकीकडे त्याला कडाडून विरोध होत आहे. अशातच च्या प्रीमियरच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे सगळे चित्र स्प्ष्ट झाले आहे.
हा व्हिडीओ x वर स्नेहा मोर्दानी या पत्रकार महिलेने 'हैदराबादमधील #Pushpa2 प्रीमियरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या दिवसाचा व्हिडिओ. एका हृदयद्रावक घटनेत ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि तिचे मूल गंभीर जखमी झाला. तपास सुरू असताना अधिकाऱ्यांनी अल्लू अर्जुनची चौकशी केली.' असे लिहून शेअर केला आहे.
या प्रकरणानंतर अल्लू अर्जुनाचे वडील निर्माता अल्लू अरविंद यांनी जखमी झालेल्या मुलाची आणि त्याच्या परिवाराची भेट घेतली. या प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी 13 डिसेंबर रोजी अल्लू अर्जुनला अटक केली आणि नंतर त्याला हायकोर्टातून अंतरिम जामीन मिळाला. अल्लू अर्जुनला अंतरिम जामीन मंजूर करण्यासोबतच न्यायालयाने त्याला या प्रकरणाच्या तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत.