Nashik : राज्यात लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला मोठं यश मिळालं. या लाडक्या बहिणी योजनेमुळे महायुतीला सहजन मॅजिक फिगर गाठता आलं. लाडकी बहीण योजनेमुळे जिंकल्याची कबुली महायुती सरकारच्या प्रमुख नेत्यांनीही मान्य केलं. त्यानंतर आता याच योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत लाडक्या बहिणी आहेत. राज्यात आधीच अर्ज केलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील ५९,५०० लाडक्या बहिणींचे अर्ज प्रलंबित असल्याची माहिती हाती आली आहे.
जिल्ह्यातील ५९,५०० लाडक्या बहिणींचे अर्ज प्रलंबित आहेत. तर एकूण ९५०० लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. या महिलांना प्रशासनाने लाभ देण्यास नकार दिला आहे. लाभ मिळवण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे न दिल्याने ९५०० अर्ज हे बाद करण्यात आले आहेत.
तर आचासंहिता लागू होण्यापूर्वी अखेरच्या टप्प्यात आलेल्या ५९५०० अर्जांवर शासनाचा आदेश आल्यानंतर निर्णय होणार आहे. त्यामुळे या महिलांना लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता १५०० की २१०० रुपये असणार आहे. याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. त्यामुळे प्रशासनाला शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
राज्यातील काही भागात डिसेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीपासून डिसेंबरच्या हप्त्याची महिलांना प्रतीक्षा होती. महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाल्यानंतर आता लवकरच २१०० रुपये द्यावे, अशी महिलांची अपेक्षा आहे. राज्यातील काही महिलांना आता योजनेचा सहावा हप्ता मिळाला आहे. या योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्याने लाडक्या बहिणींच्या वर्तुळात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.
अंगणवाडीतील महिला आंदोलनाच्या तयारीतदरम्यान, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपासून जिल्हापरिषद समोर आंदोलन करण्याचं ठरवलं आहे. 3 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या आंदोलनाच्या माध्यमातून विविध प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली जाणार आहे.
प्रवास भत्ता, सिबीई कार्यक्रम निधी, गणवेश निधी, परिवर्तन निधी, मोबाईल रिचार्ज सोबतच लाडकी बहीण योजनेत काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता न देणे यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन संघटनेचे राज्य अध्यक्ष दिलीप उटाणे यांनी केले आहे.