Raj Thackeray: मनसे शहर संघटकावर गो-हत्येचा गुन्हा, वाचा काय आहे प्रकरण?
esakal December 25, 2024 01:45 PM

Ambernath Crime News: अंबरनाथ मनसे शहर संघटक युसूफ शेखवर गो-हत्येचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी युसूफचा भाऊ जलालुद्दीन शेख याने दिलेल्या तक्रारीनंतर अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


जलालुद्दीन याच्या दुकानाच्या जवळच युसूफचे मटणविक्रीचे दुकान आहे. जलालुद्दीनच्या मोबाईलवर ७ डिसेंबरला काही व्हिडिओ आले. त्यात युसूफ हा वुलन चाळ येथील एका रूममध्ये उभा असून, त्याचे साथीदार गोवंशीय जनावरे कापत असल्याचे दिसत आहे.

दुसऱ्या व्हिडिओत एका मोकळ्या जागेत गोवंशाच्या हत्या करण्यात आल्या असून, मांस एका फोर्ड इंडिव्हर गाडीत ठेवले जात आहे. या गाडीवर मनसेचा जुना झेंडासुद्धा आहे. ही गाडी युसूफ याचीच असल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे. त्यानुसार युसूफसह त्याच्या साथीदारांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

गोमांसविक्रीतील सहभाग उघड
युसूफ शेख अनेक वर्षांपासून गोमांसविक्रीचा धंदा करत असून, यापूर्वीसुद्धा त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला होता, मात्र त्या वेळी पक्षाने कोणतीही कारवाई केली नव्हती, पण हिंदुत्ववादीची भूमिका घेणाऱ्या मनसेकडून आता कारवाई होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.