धनंजय शेटे
भूम : भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी केलेले आक्षेपार्ह विधान हे त्यांना शोभत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल शहा यांनी गरळ ओखली आहे. अशा मंत्र्यांनी खुर्चीवर न बसता त्यांनी राजीनामा द्यावा. तसेच परभणी येथील भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या संबंधित पोलिस प्रशासनाच्या विरुद्ध भूम शहरात भिमसैनिकांच्यावतीने कडकडीत बंद करून निदर्शने करीत प्रतिमेची प्रेत यात्रा काढत मोर्चा काढून दि.२५ डिसेंबर रोजी जाहीर निषेध नोंदवला.
गृहमंत्री शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आंबेडकर, आंबेडकर असे म्हणण्याची फॅशन झाली आहे असे म्हणून त्यांचा अवमान केला आहे. शहा यांच्या या आक्षेपार्ह विधानाचा जाहीर निषेध व परभणी येथील शहीद भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यू कारणीभूत असलेल्या पोलीस प्रशासनाच्या विरोधात भूम येथे भिमसैनिकांच्यावतीने कडकडीत बंद करून निदर्शने मोर्चा काढण्यात आला. यावेळी व्यापारी मंडळाच्या पदाधिकान्यांनी मोठ सहकार्य केले. यांचबरोबर राजकीय व्यक्तींनीसुद्धा पाठिंबा दिला.
भूम येथील भिमनगरमधील बौद्ध विहारपासून मान्यवरांच्या हस्ते तथागत भावान गौतम बुद्ध व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मोर्चास सुरुवात करण्यात आली. हा मोर्चा भिमनगर येथून शेंडगे गल्ली, ते गांधी चौक गल्ली, नगर परिषद मार्गे मोठी निदर्शने करीत शहा यांच्या निषेधार्थ प्रचंड घोषणाबाजी करीत त्यांच्या प्रतिमेची प्रेत यात्रा काढण्यात आली. हा मोर्चा गोलाई चौकात येऊन थांबला. या मोर्चाचे जाहीर निषेध
सभेत रूपांतर झाले. यावेळी अमित शहा यांनी देशाची माफी मागून गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या , शाहिद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबाचे ५० लाख रुपये देऊन पुनर्वसन करन्याची मागणी. त्यांच्याशर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आदींसह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रविण दादा रणबागुल, चंद्रमणी गायकवाड, रोहित गायकवाड, महेंद्र गायकवाड, ऍड बाळासाहेब सुकाळे विकी जावळे, सचिन शिंदे, कदू जानराव, सायरन गायकवाड, राहुल शिंदे, अक्की गायकवाड, वैभव गायकवाड, अक्षय गायकवाड, विशाल शिंदे, रोहित जानराव, मुकुंद लगाडे, प्रकाश सीतापे, अमित थोरात, अज्जू वाघमारे, आकाश कोरडे, किरण शिंदे काँग्रेस उपाध्यक्ष विलास शाळू, शिवसेना तालुकाप्रमुख अनिल दादा शेंडगे, सिराज मोगल, फेरोज शेख लहुजी शक्ती सेनेच्या अश्विनी ताई साठे,रिपब्लिकन सेनेच्या रेश्मा शेख, लहुजी सेना तालुका ध्यक्ष दत्ता साठे तसेच भीमसैनिक व माहिला उपस्थित होते शेकडो भिमसैनिक सहभागी झाले होते.