Sprouted Chaat: सकाळी मोड आलेल्या मुगापासून बनवा हेल्दी आणि चविष्ट नाश्ता, लगेच लिहून घ्या रेसिपी
esakal December 26, 2024 03:45 PM

Sprouted Chaat: सकाळी नाश्त्यात मोड आलेल्या मुगाचे सेवन करू शकता. कारण ते भरपूर पौष्टिक, हलके आणि सहज पचण्याजोगे आहे. मोड आलेल्या मूगमध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि अनेक खनिजे आढळतात. ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि पचनक्रिया निरोगी राहते. हे केवळ स्वादिष्टच बनवता येत नाही तर नाश्त्यासाठी हा एक पौष्टिक आणि संतुलित पर्याय आहे. तुम्ही मोड आलेल्या मूगापासून पुढील पदार्थ बनवू शकता.

साहित्य

1 कप मोड आलेले मूग

1 छोटा टोमॅटो (चिरलेला)

1 छोटा कांदा (चिरलेला)

1 टीस्पून लिंबाचा रस

½ टीस्पून चाट मसाला

काळे मीठ

मीठ

तिखट - चवीनुसार

कृती

सर्वात आधी मोड आलेले मूग चांगले धुवून एका भांड्यात ठेवा. नंतर त्यात टोमॅटो, कांदा, चाट मसाला, मीठ, काळे मीठ आणि लाल तिखट घालून मिक्स करा. वरून लिंबाचा रस पिळून हिरवी कोथिंबीर टाकून सर्व्ह करा. ही चाट फक्त चवीलाच नाही तर पौष्टिकतेनेही भरपूर आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.