घाटकोपर येथील खैरानी रोड येथे भीषण आगीत भंगार गोदामे जळून खाक झाली आहेत.
Nashik Live: दारणा धरणातून सिंचनासाठी पाण्याचं आवर्तन सोडणार- पुढील आठवड्यात सिंचनासाठी सोडणार पाण्याचं आवर्तन
- गोदावरी उजवा तट कालवा, दारणा आणि गोदावरी नदीवरील गावांसाठी सोडणार पाणी
- सिंचनासाठी 800 दशलक्ष घनफुट आणि बिगर सिंचनासाठी 500 दशलक्ष घनफुट पाणी सोडणार
- आवर्तन कालावधीत कालव्याच्या तटावरील काही गावांमधील वीज पुरवठा २२ तास खंडित ठेवण्यात येणार
- पाण्याची चोरी रोखण्यासाठी वीज पुरवठा खंडित ठेवण्याचा निर्णय
Manmohan Singh Live Updates: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी जागा देण्यात येणारमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी जागा देण्यात येणार, एका ट्रस्टची स्थापना करुन सर्व औपचारिकता पूर्ण केल्या जातील-- गृहमंत्रालयाची माहिती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड प्रकरणातील आरोपीला सोडले जाणार नाही असं म्हटले असतानाही आमदार सुरेश धस यांना आपले मुख्यमंत्री म्हणतात कोणालाही सोडणार नाही हे तुम्हाला मान्य नाही का? मारेकऱ्यांना गुन्हेगारांना शिक्षा द्यायची की आपली राजकीय पोळी भाजायची आहे याचा प्रत्येक आलाय.
कोणी कोणाच्या कार्यक्रमाला जायचं काय करायचं हा त्या अभिनेत्रींचा खाजगी आयुष्य आहे. वाटेल ते आरोप करत आहात वाटेल ते बोलत आहात लोकशाही आहे ठीक आहे पण या घटनेचा तपास सुरू आहे. तपासात व्यक्त येण्याचं काम सुरेश धस करत आहेत.
अमोल मिटकरी यांना धमकी दिले जाते यावरून कळतं की बीडमध्ये गुन्हेगारी कोणाची वाढलेली आहे. पोलीस यंत्रणा सीआयडी त्यांचं काम करत आहेत गुन्हेगाराला शिक्षा होईल पण सुरेश धस यांनी यावर आपले वक्तव्य करू नयेत.
आमदार सुरेश धस यांनी पहिल्यांदा स्वतःकडे बघितलं पाहिजे बीडची परिस्थिती ही का झाली यातून राजकीय पोळी भाजून नये सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन देशमुख यांच्या आरोपीला शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करावेत, असे रुपाली पाटील म्हणाल्या.
Beed protest Live Updates : मस्साजोग आज कडकडीत बंद, गावात शुकशुकाटबीड जिल्ह्यातील मस्साजोग आज कडकडीत बंद आहे. अख्खं गाव बीड मोर्चा मध्ये सहभागी होणार असल्याने गावकरी बीडमध्ये पोहचले आहेत. गावात शुकशुकाट आहे.
Live Updates : मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप; दिल्लीतील निमबोध घाटावर होणार अंत्यसंस्कारमनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप दिला जातो आहे. त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे. दिल्लीतील निमबोध घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
Beed Live News : बीडमध्ये निघणारा हा मोर्चा हा सर्वपक्षीय - संदीप क्षीरसागरबीडमध्ये निघणारा हा मोर्चा सर्वपक्षीय मोर्चा आहे. सीआयडी कडून चौकशी सुरू आहे, मात्र काही गोष्टी तपासाच्या सांगता येत नसतात, त्यामुळे त्यांनी काय सांगितलं नाही. वाल्मीक कराड यांना अटक होत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा. आम्ही कोणतं यामध्ये राजकारण करत नाहीत. कोणत्या विशिष्ट जाती विषयी बोलत नाहीत . आजच्या मोर्चामध्ये सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येणार आहेत. आमची एकच मागणी आहे, संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी, वाल्मीक कराड यांचे सीडीआर तपासा . कराड यांना अटक करा, अशी प्रतिक्रिया संदीप क्षीरसागर यांनी दिली.
Maharashtra Live News : मुख्यमंत्र्यांनी ॲक्शन मोडवर यावं, संतोष देशमुख प्रकरणात कुणालाही सोडू नये - मनोज जरांगेसंतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बीड येथे सर्वपक्षीय शांतता मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे .दरम्यान बीडच्या मोर्चानंतर राज्यभर मराठ्यांचे मोर्चे निघणार असून प्रत्येक जिल्ह्यातील मराठ्यांनी मोर्चाच्या तयारीला लागा अस आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केल आहे. मुख्यमंत्री साहेब तुम्ही संतोष देशमुख यांच्या आरोपींना सोडू नका आता ॲक्शन मोडवर या असं आवाहन देखील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केल आहे.
नागपुरच्या सदरच्या आझाद चौकात एका घरात सिलिंडरचा स्फोट
सिलिंडरचा स्पोट झाल्याने आगीचा भडका...
सुदैवाने घरातील सदस्य बाहेर पडल्याने जीवितहानी झाली नाही...
अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवलं...
मात्र घरातील साहित्य जळून नुकसान झालं...
Dr. Manmohan Singh Passes Away LIVE : अंत्यदर्शनासाठी माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव AICC मुख्यालयात ठेवण्यात येणारदिल्ली : माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव AICC मुख्यालयात नेले जात आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव तिथे ठेवण्यात येणार आहे.
कोल्हापूर : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील हे मंत्रिपद मिळाल्यानंतर प्रथमच रविवारी (ता. २९) कोल्हापुरात येत आहेत. त्यांचे भाजपच्या वतीने कोल्हापूर रेल्वेस्थानक येथे सकाळी स्वागत करण्यात येणार आहे. यानंतर सायंकाळी सहा ते आठ या वेळेत नागाळा पार्क येथील भाजप कार्यालय येथे उपस्थित राहून ते शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
Singer Shreya Ghoshal LIVE : प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांच्या संगीत मैफिलीची उत्सुकता पोहोचली शिगेलापुणे : आपल्या सुमधुर आवाजाने हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजविणाऱ्या प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांच्या शनिवारी होणाऱ्या संगीत मैफिलीची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. कोथरूडच्या सूर्यकांत काकडे फार्म येथे या मैफिलीची तयारी पूर्ण झाली आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे शनिवारी (ता. २८) सायंकाळी ६.३० वाजता श्रेया घोषाल यांच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.
Sarpanch Santosh Deshmukh Murder Case LIVE : सरपंच संतोष देशमुख यांची हत्या, बीडमध्ये आज सर्वपक्षीय मोर्चाबीड : संसदेपासून राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गाजलेल्या मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला तीन आठवडे उलटले तर अद्याप काही संशयित फरारी आहेत. त्यांना अटक आणि सूत्रधारावर खुनाचा गुन्हा नोंद करण्याच्या मागणीचा रेटा जिल्ह्यात कायम आहे. याच मागणीसाठी शनिवारी (ता. २८) बीडमध्ये सर्व जातीय, सर्व पक्षीय मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा, पोलिस प्रशासन सावध झाले आहे. पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी आदींनी शुक्रवारी (ता. २७) सुरक्षेच्या दृष्टीने बैठक घेऊन बंदोबस्ताचा आढावा घेतला. दिवंगत देशमुख यांची मुलगी वैभवी, भाऊ धनंजय यांच्यासह मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद जितेंद्र आव्हाड, यांच्यासह भाजप आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर आदी या मोर्चात सहभागी होणार आहेत.
Nagpur Accident LIVE : वाढदिवस आटोपून घरी परत जाताना मायलेकाचा अपघाती मृत्यूचुलत बहिणीच्या मुलाचा वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून घरी परत जात असताना ऑटो डीवाईडरवर धडकून उलटल्याने मुलाचा आणि त्याच्या आईचा जागीच मृत्यू झाला. एमआयडीसी - वाडी मार्गावरील प्लास्टो कंपनी समोर गुरुवारी रात्री ही घटना घडली. याबाबत एमआयडीसी पोलिसांत नोंद झाली आहे. रोहित साखरे, करुणा साखरे असे मृत मायलेकाचे नाव आहे.
Mumbai Fire LIVE : मुंबईतील खैराणी रोड साकिनाका परिसरात भीषण आगमुंबईतील खैराणी रोड साकिनाका परिसरात भीषण आग लागली आहे. या ठिकाणी असलेल्या गोदामाला आग लागली असून आगीत २ गोदामने पेट घेतला आहे. झोपडपट्टी भागात ही आग लागल्याने अग्निशामक दलाला शर्यतीचे प्रयत्न करावे लागत आहेत.
Jammu and Kashmir News : रोप-वे प्रकल्पाविरोधात श्री माता वैष्णो देवी संघर्ष समितीकडून ७२ तासांच्या बंदचे आवाहनश्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कत्रा जिल्ह्यातील प्रस्तावित रोप-वे प्रकल्पाविरोधातील आंदोलन सलग तिसऱ्या दिवशी सुरूच होते. आणखी काही स्थानिकांनी उपोषण सुरू केल्याने या आंदोलनाची तीव्रता आणखी वाढली आहे. या प्रकल्पाच्याविरोधात श्री माता वैष्णो देवी संघर्ष समितीकडून ७२ तासांच्या बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
Bangalore Airport LIVE : बंगळूर विमानतळावर ८० लाखांचा गांजा जप्तबंगळूर : बंगळूरमध्ये विमानतळ सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी आठ किलो उच्च दर्जाच्या हायड्रोपोनिक गांजाची तस्करी करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. बँकॉकहून वेगळ्या फ्लाइटने आलेल्या दोन प्रवाशांकडून सुमारे ८० लाखांचा गांजा त्यांनी जप्त केला. हायड्रोपोनिक गांजा हा प्रयोगशाळेत पाण्यात पोषक द्रव्ये टाकून उगवला जातो. सीमाशुल्क अधिकाऱ्याने सांगितले की, केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (केआयए) तीन आठवड्यांत या प्रकारच्या ड्रग्जची ही दुसरी जप्ती आहे. याप्रकरणी दोघे अनुक्रमे १९ डिसेंबर आणि २० डिसेंबर रोजी थायलंडहून विमानतळाच्या टर्मिनल दोनवर पोहोचले. प्रवाशांच्या प्रोफाईलिंगच्या आधारे त्यांना थांबवण्यात आले. २० दिवसांपूर्वी बँकॉकहून घरी परतत असल्याचे त्यांच्या पासपोर्टवरून स्पष्ट झाले. पर्यटक असल्याचे भासवणाऱ्या आणि काहीतरी तस्करी करू इच्छिणाऱ्यांनी ही पद्धत अवलंबली आहे. दोघेही मध्यमवयीन आणि भारतातीलच रहिवासी आहेत.
Dr. Manmohan Singh Passes Away LIVE : माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंग यांच्यावर दिल्लीतील राजघाटावर शासकीय इतमामात आज अंत्यसंस्कारLatest Marathi Live Updates 28 December 2024 : माजी पंतप्रधान आणि थोर अर्थशास्त्रज्ञ मनमोहन सिंग यांचे गुरुवारी (ता. २६) निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दिल्लीतील राजघाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
तसेच मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदचा मेहुणा आणि बंदी घालण्यात आलेल्या जमात - उद् - दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफीज अब्दुल रेहमान मक्की याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
बेकायदा वाळू उत्खननप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बिहारमध्ये पाटण्यासह अन्य काही शहरांत छापे घातले. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील हे मंत्रिपद मिळाल्यानंतर प्रथमच रविवारी (ता. २९) कोल्हापुरात येत आहेत.
त्यांचे भाजपच्या वतीने कोल्हापूर रेल्वेस्थानक येथे सकाळी स्वागत करण्यात येणार आहे. खानदेशातील तीन जिल्ह्यांना शुक्रवारी बेमोसमी पावसाचा तडाखा बसला. जळगाव शहरासह जिल्ह्यातील यावल, रावेर तालुक्यात काल सायंकाळी मुसळधार पाऊस झाला.
काही ठिकाणी गारपीट झाली. राज्यात आजही ढगाळ वातावरण आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..