उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी निगम बोध घाट येथे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अखेरची श्रद्धांजली वाहिली
Former PM Manmohan Singh Funeral Live Updates: मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान मोदी उपस्थितमनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान मोदी उपस्थित आहेत
Former PM Manmohan Singh Funeral Live Updates: मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा निगम बोध घाटावरमाजी पंतप्रधाना मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांचे निगम बोध घाटावर
Former PM Manmohan Singh Funeral Live Updates: जे पी नड्डा मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी रवानाजे पी नड्डा हे मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी रवाना झाले आहेत.
मनमोहन सिंग यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आहे. यावेळी फक्त भारतासाठी नाही तर जगभरात आज दुःखाचा दिवस, असं काँग्रेस नेते मनिष तेवारी यांनी म्हटले आहे.
Former PM Manmohan Singh Funeral Live Updates: एक सच्चा राजकारणी आणि लोक समर्पित नेता - जो बायडेनमाजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधना बद्दल आमेरीकेचे माजी अध्यक्ष जो बायडेन म्हणाले, "एक सच्चा राजकारणी आणि समर्पित लोकसेवक"
Former PM Manmohan Singh Funeral Live Updates: मनमोहन सिंग यांची अंत्ययात्रा निघालीमनमोहन सिंग यांची अंत्ययात्रा निघाली आहे. त्यांचे पार्थिव निगम बोध घाटच्या दिशेने रवाना झाले आहे.
मनमोहन सिंग यांचे पार्थिक काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात आहे. यावेळी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी आदरांजली वाहिली आहे.
Former PM Manmohan Singh Funeral Live Updates: पत्नी अन् कन्येने मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजलीकाँग्रेसच्या मुख्य कार्यालयात गुरशन कौर आणि दमन सिंग यांनी मनमोहन सिंग यांना आंदराजली वाहिली आहे.
Former PM Manmohan Singh Funeral Live Updates: मनमोहन सिंग यांचे पार्थिव काँग्रेसच्या कार्यालयातमनमोहन सिंग यांचे पार्थिक काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात आणण्यात आले आहे. काही वेळातच पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे.
Former PM Manmohan Singh Funeral Live Updates: जिथे मनमोहन सिंग यांचे स्मारक बांधणार तिथेच अंत्यसंस्कार करावेसंपूर्ण देशाला वाटतंय की,जिथे मनमोहन सिंग यांचे स्मारक बांधणार तिथेच अंत्यसंस्कार करावे असे काँग्रेसचे नेते प्रताप सिंग म्हणाले
गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी (२७ डिसेंबर २०२४) सकाळी ११:४५ वाजता दिल्लीतील निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Former PM Manmohan Singh Funeral Live Updates: पंजाब विद्यापीठाने डॉ. मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजलीमाजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंजाब विद्यापीठाने शुक्रवारी शोकसभेचे आयोजन केले होते. डॉ सिंह पंजाब विद्यापीठाचे माजी विद्यार्थी होते. या बैठकीला कुलगुरू प्राध्यापिका रेणू विज, कुलसचिव वाय.पी.वर्मा आणि प्राध्यापक व इतर कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि उपस्थितांनी राष्ट्र उभारणीतील त्यांचे योगदान आणि विद्यापीठाशी असलेल्या त्यांच्या संबंधांबद्दल आपले मत व्यक्त केले. अर्थशास्त्र विभाग आणि पंजाब विद्यापीठ माजी विद्यार्थी संघटनेने संयुक्तपणे आणखी एक शोकसभा आयोजित केली होती.
Former PM Manmohan Singh Funeral Live Updates: माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काँग्रेसने बैठक बोलावलीकाँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी काँग्रेस कार्यकारिणीच्या (CWC) बैठकीसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) मुख्यालयात पोहोचल्या. माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे.
Former PM Manmohan Singh Funeral Live Updates: मनमोहन सिंग हे आमच्यासाठी आदर्श शिक्षक होते- केंद्रीय मंत्रीमाजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनावर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग म्हणाले, "संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे... ते एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. माझ्यासारख्या अनेक लोकांसाठी ते एक आदर्श शिक्षक होते, जे शिक्षण जगताशी निगडीत आहेत. "ते शालीनता आणि प्रतिष्ठेचे प्रतीक होते."
Former PM Manmohan Singh Funeral Live Updates: मनमोहन सिंग यांच्या निधनावर अमेरिकन मीडियाने काय म्हटलेअमेरिकन वृत्तपत्र CNN ने म्हटले आहे की यामुळे भारताच्या जागतिक आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकन वृत्तपत्रानुसार, मनमोहन सिंग यांनी अमेरिका-भारत संबंध मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
Former PM Manmohan Singh Funeral Live Updates: मनमोहन सिंग यांचे निधन हे देशाचे मोठे नुकसान - सिंधियाकेंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले, "मनमोहन सिंग यांचे निधन हे देशाचे मोठे नुकसान आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केले, तसेच त्यांनी शिक्षणाच्या जगात नवीन उंची गाठली. ते अर्थशास्त्राचे अभ्यासक होते. त्यांचे योगदान देशाच्या प्रगतीसाठी मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि शोकाकुल कुटुंबाला हे नुकसान सहन करण्याची शक्ती देवो.”
Former PM Manmohan Singh Funeral Live Updates: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात कधीही जातीय दंगल झाली नाही - मेहबुबा मुफ्तीपीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, "जेव्हा संपूर्ण जग आर्थिक संकटाचा सामना करत होते, तेव्हा भारताला त्या मंदीचा फटका बसला नव्हता कारण डॉ. मनमोहन सिंग हे आपल्या देशाचे अर्थमंत्री होते. माझ्या आयुष्यात इतका मृदू मनाचा माणूस मला भेटला नाही. "पाहिले नव्हते. डॉ. मनमोहन सिंग 10 वर्षे भारताचे पंतप्रधान होते, पण त्या वेळी कधीही जातीय दंगल झाली नाही. त्यांच्याबद्दलची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते फार कमी बोलत, पण खूप करतात."
Former PM Manmohan Singh Funeral Live Updates: 'मनमोहन सिंग यांनी भारतीय राजकारणात मोठे योगदान दिले' - बिर्लालोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले, "मनमोहन सिंग यांनी भारतीय राजकारणात मोठे योगदान दिले आहे. त्यांनी आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठे बदल केले. देश त्यांचे योगदान सदैव स्मरणात ठेवेल. पंतप्रधानपद भूषवताना त्यांनी देशाच्या राजकारणात मोठे योगदान दिले. देशाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी त्यांनी दिलेले योगदान देशासाठी एक मोठे नुकसान म्हणून स्मरणात राहील. "
Former PM Manmohan Singh Funeral Live Updates: सचिन पायलट यांनी वाहिली आदरांजलीकाँग्रेस नेते सचिन पायलट यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली.
Former PM Manmohan Singh Funeral Live Updates: फारुख अब्दुल्ला यांनी व्यक्त केला शोकमनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल एनसी नेते फारुख अब्दुल्ला यांनी शोक व्यक्त केला आहे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी केलेल्या कार्यावर चिंतन केले आणि त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
Former PM Manmohan Singh Funeral Live Updates: मनमोहन सिंग यांच जाण हा देशासाठी धक्का- माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंदमनमोहन सिंग हे इंडियन इकॉनोमीचे आधुनिक निर्माता होते. मनमोहन सिंग सौम्यतेचे प्रतीक होते. आपल्या देशाला हा अतिशय मोठा धक्का आहे अशी प्रतिक्रिया माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिली
Former PM Manmohan Singh Funeral Live updates: त्यांच्या योगदानाला देश नेहमी लक्षात ठेवेल - मोहन भागवतराष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांनी मनमोहन सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. यावेळी ते सामान्य परिवाराचे असुनही देशाच्या सर्वोच्च पदावर पर पोहचले वे विख्यात अर्थशास्त्री होते त्यांच्या योगदानाला देश नेहमी लक्षात ठेवेल
Former PM Manmohan Singh Funeral Live updates: उपेक्षित समाजाच्या उन्नतीसाठी काम करणारे पहिले पंतप्रधान; असदुद्दीन ओवेसींची आदरांजलीउपेक्षित समाजाच्या उन्नतीसाठी काम करणारे पहिले पंतप्रधान म्हणत असदुद्दीन ओवेसी यांनी मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली
मनमोहन सिंग भारतरत्नचे पात्र आहेत. त्यांना तो मिळायलाच हवा असे आप खासदार संजय सिंग म्हणाले आहेत.
Former PM Manmohan Singh Funeral Live updates: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मनमोहन सिंग यांना वाहिली आदरांजलीमाजी पंतप्रधान मनमोहन सिंग त्यांचे जाणे आपल्या सर्वांसाठी नुकसान आहे. त्यांच्या निष्कलंक राजकीय जीवनासाठी आणि अत्यंत नम्रतेसाठी ते नेहमीच स्मरणात राहतील. अशा शब्दांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली आहे.
जेव्हा मनमोहन सिंग यांनी मोहम्मद अली जिनांच्या चेहऱ्यावर चेंडू मारला होता, नेमका काय होता किस्सा? Former PM Manmohan Singh Funeral Live updates: राष्ट्रपती भवनावरचा राष्ट्रध्वज उतरवण्यात आला खालीमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानिमित्त राष्ट्रपती भवनावरचा राष्ट्रध्वज खाली उतरवण्यात आला आहे.
Former PM Manmohan Singh Funeral Live updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलं डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं दर्शनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाच दर्शन घेतलं. त्यांच्या निवासस्थानी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली
Former PM Manmohan Singh Funeral Live updates: अँटनी ब्लिंकन वाहिलीं मनमोहन सिंघांना श्रद्धांजली"भारत-अमेरिका जवळ आणण्यासाठी मनमोहन सिंग यांचे स्मरण केले जाईल" असे अँटनी ब्लिंकन मनमोहन सिंघांना श्रद्धांजली वाहतांना म्हणाले.
मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी म्हणजेच उद्या अंत्यसंस्कार केले जातील. त्याविषयीची अधिकृत घोषणा आज केला जाईल असे म्हटले जात आहे.
Raj Thackeray on Manmohan Singh: राज ठाकरेंनी वाहिली मनमोहन सिंग यांना श्रद्धांजलीमनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली
https://www.facebook.com/story.php?story_fbid=1143733970446838&id=100044307376010&rdid=4EUJrJNuFYBm6jAx Former PM Manmohan Singh Funeral Live updates: डॉ. मनमोहन सिंग आणि शिवाजी विद्यापीठाचा शानदार पदवीदान समारंभ; 'त्या' घटनेला 30 वर्षे झाली पूर्ण Former PM Manmohan Singh Funeral Live updates: डॉ मनमोहन सिंग यांनी संसदेतील चर्चांचा स्तर उंचावला: राज्यपाल सी पी राधाकृष्णनमहाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी देशाचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ, मुत्सद्दी आणि संसदपटू होते.
अर्थमंत्री या नात्याने भारतीय अर्थव्यवस्थेच्या अत्यंत कठीण काळात त्यांनी देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढले आणि जागतिकीकरण व उदारीकरणाच्या मार्गावर नेले.
Former PM Manmohan Singh Funeral Live updates: राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्राची मोठी हानी - उपमुख्यमंत्री अजित पवारभारतासारख्या विकसनशील देशाला जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणाच्या वाटेवर नेण्याचा क्रांतिकारी निर्णय घेणारे आणि तो निर्णय कमालीचा यशस्वी करुन दाखवणारे देशाचे माजी पंतप्रधान, जागतिक किर्तीचे अर्थतज्ञ डॉ. मनमोहनसिंह यांचं निधन ही देशाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्राची मोठी हानी आहे. भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याच्या कार्याचा पाया डॉ. मनमोहनसिंह यांनी रचला. गेल्या अनेक दशकात आलेल्या प्रत्येक जागतिक मंदीसमोर भारताची अर्थव्यवस्था पाय घट्ट रोवून भक्कमपणे उभी राहिली, याचं बहुतांश श्रेय डॉ. मनमोहनसिंह यांनी देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान म्हणून त्याकाळात घेतलेल्या दूरदष्टीपूर्ण निर्णयांना आहे, असे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी डॉ. मनमोहनसिंह यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांना आदरांजली वाहिली.
Former PM Manmohan Singh Funeral Live updates: देशाने एक जागतिक दर्जाचा अर्थतज्ज्ञ विद्वान गमावला- रामदास आठवलेमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची अर्थतज्ज्ञ म्हणून कामगिरी जागतिक दर्जाची होती.त्यांच्या निधनाने भारत देशाची मोठी हानी झाली आहे.देशाने एक जागतिक दर्जाचा अर्थतज्ज्ञ विद्वान गमावला आहे असे रामदास आठवले म्हणाले
Manmohan Singh: मनमोहन सिंग त्यांचे हिंदी भाषण नेहमी उर्दू लिपीत का लिहित असत? Former PM Manmohan Singh Funeral Live updates : मनमोहन सिंग निळी पगडी का घालत होते? Former PM Manmohan Singh funeral Live updates: मनमोहन सिंहांच्या एका निर्णयामुळे महाराष्ट्रात भाजप शिल्लक राहिली, नाहीतर आज चित्र वेगळं असतं Former PM Manmohan Singh funeral Live updates : मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीरमनमोहन सिंग यांच्या निधनानंतर ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.