SL vs NZ : न्यूझीलंडचा अवघ्या 8 धावांनी श्रीलंकेवर विजय, जेकॉब डफी ठरला सामनावीर
GH News December 28, 2024 07:09 PM

तीन सामन्याच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंड आणि श्रीलंका हो दोन संघ आमनेसामने आले होते. नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी गमवून 172 धावा केल्या आणि विजयासाठी 173 धावांचं आव्हान दिलं. पण श्रीलंकेचा संघ 20 षटकात 8 गडी गमवून धावा करू शकला. श्रीलंकेला विजयासाठी 8 धावा कमी पडल्या आणि पराभवाचं तोंड पाहावं लागलं. श्रीलंकेला 12 चेंडूत 21 धावा हव्या होत्या. तसेच हातात 6 गडी शिल्लक होते. पण 19 व्या षटकात 2 गडी गमवून फक्त 6 धावा आल्या. म्हणून शेवटच्या षटकात 14 धावांची आवश्यकता होती. पण या षटकाच्या सुरुवातीच्या दोन चेंडूवर दोन विकेट आल्या आणि श्रीलंका बॅकफूटवर गेली. शेवटच्या चार चेंडूवर फक्त 5 धावा आल्या आणि सामना 8 धावांनी गमवावा लागला. जेकॉब डफीला त्याच्या उत्तम गोलंदाजीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्याने 4 षटकात 21 धावा देत 3 गडी बाद केले.

श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंका म्हणाला की, निकालाबाबत खूप निराश आहे. आम्ही खरोखरच अधिक चांगले करायला हवे होते. सलामीवीरांनी खरोखरच चांगली फलंदाजी केली. त्याशिवाय माझ्यासह बाकीच्यांना जबाबदारी घेणं आवश्यक होतं. हेच या खेळाचे सौंदर्य आहे, गोष्टी लवकर बदलू शकतात, आम्ही चांगले पुनरागमन करू अशी आशा आहे. मला वाटले की आम्ही गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात थोडी चांगली कामगिरी करू शकलो असतो.’

दोन्ही संघाचे खेळाडू

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चरित असालंका (कर्णधार), भानुका राजपक्षे, वानिंदू हसरंगा, बिनुरा फर्नांडो, महेश थेक्षाना, मथीशा पाथिराना, नुवान थुशारा.

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): टिम रॉबिन्सन, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल हे (विकेटकीपर), मिचेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, झकरी फॉल्केस, जेकब डफी

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.