मन उडू उडू झालं फेम अभिनेत्याची स्वप्नपूर्ती ! गृहप्रवेशावेळी पत्नीने घेतला भन्नाट उखाणा
esakal December 28, 2024 07:45 PM

Marathi Entertainment News : स्वतःचं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न अनेकांनी पाहिलं असतं. पण फार कमी जण हे स्वप्न पूर्ण करू शकतात. मराठी इंडस्ट्रीमधील अभिनेत्यानेही त्याचं स्वतःच हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ त्याने शेअर केलं.

झी मराठीवरील मन उडू उडू झालं ही मालिका खूप गाजली. ही मालिका संपून दोन वर्षं झाली असली तरीही मालिकेची लोकप्रियता टिकून आहे. या मालिकेत कार्तिकची निगेटिव्ह भूमिका साकारणारा अभिनेता ऋतुराज फडकेने स्वतःच घर घेतलं. सोशल मीडियावर त्याने घरातील गृह्प्रवेशाचा व्हिडीओ शेअर केला.

नुकतंच ऋतुराजच्या पत्नीने हा व्हिडीओ शेअर केला. तिने घेतलेला हा उखाणाही व्हायरल होतोय. "दोघांनी मिळून पाहिलेले एक स्वप्न, अखेर आज तो दिवस आला स्वतःच हक्काचं घर घेऊन खूप आनंद झाला, तुमच्या सगळ्याचे आशीर्वाद असेच असुदे पाठीशी, ऋतुराज रावांचं नाव घेते वास्तुशांतीच्या दिवशी. " उखाणा घेताना त्याची पत्नी भावूक झाली.

अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत ऋतुराजचं अभिनंदन केलं. "अखेर तू तुझं स्वप्न पूर्ण केलंस" अशी कमेंट एकाने केली. तर एकाने "किती सुंदर. अगदी साजेसं नाव घेतलं" असं म्हणत प्रितीने घेतलेल्या नावाचं कौतुक केलं. "तुमची सगळी स्वप्नं अशीच पूर्ण होवोत" अशी कमेंट एकाने केली आहे.

मन उडू उडू झालं या मालिकेनंतर ऋतुराजने धर्मवीर 2मध्ये काम केलं. या सिनेमात त्याने नंदू शेडगे ही भूमिका साकारली होती. अनेकांना ही भूमिका आवडली. याशिवाय त्याने 217 पद्मिनी धाम हे त्याच नाटकही खूप गाजलं. याशिवाय तो क्रिकेटरही आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.