नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बदलणार ‘हे’ 6 नियम, तुमच्यावर नेमका काय होणार परिणाम?
Marathi December 29, 2024 01:24 AM

1 जानेवारी 2025 पासून नवीन नियम: नवीन वर्षाची सुरुवात होण्यास फक्त तीन दिवस बाकी आहे. या नवीन वर्षात अनेक मोठे बदल होणार आहे. या बदलांच्या संदर्बातील माहिती तुम्हाला आहे का?  नसेल तर  1 जानेवारी 2025 पासून होणाऱ्या बदलांच्या संदर्भातील माहिती आपण पाहणार आहोत. या बदलांच्या तुमच्यावर नेमका काय परिणाम होणार याचीही माहिती पाहुयात.

नवीन कार घेणे महाग होणार

नवीन वर्षात म्हणजे 1 जानेवारी 2025 पासून नवीन कार घेणे तुमच्यासाठी महाग होणार आहे. टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, ह्युंदाई, महिंद्रा, मर्सिडीज-बेंझ, होंडा, ऑडी इत्यादी अनेक कार कंपन्यांनी आपल्या गाड्या महाग करण्याचे आधीच जाहीर केले आहे. त्यामुळं तुम्ची जर नवीन वर्षात कार खरेदी करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला थोडा अधिक आर्थिक फटका बसू शकतो. महत्वाच्या कंपन्यांनी कारच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

पेन्शनधारक देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शन काढू शकणार

नवीन वर्षात EPFO ​​पेन्शनवर मोठा दिलासा मिळणार आहे. नव्या नियमानुसार आता पेन्शनधारक देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शन काढू शकणार आहेत. यासाठी त्यांना कोणत्याही अतिरिक्त पडताळणीची गरज भासणार नाही.

NPCI ने पैशांची मर्यादा वाढवली

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने नवीन वर्षात UPI 123Pay ची मर्यादा देखील वाढवली आहे. आत्तापर्यंत, या पेमेंट सेवेद्वारे कमाल 5,000 रुपयांपर्यंतचे व्यवहार केले जाऊ शकतात. नवीन वर्षात त्याची मर्यादा 10,000 रुपये करण्यात आली आहे.

गॅसच्या दरात वाढ होण्याची शक्यता

एलपीजी (LPG) च्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी कमी जास्त होतात. अशा परिस्थितीत 1 जानेवारी 2025 रोजी तेल कंपन्या एलपीजीच्या किमतीत काही बदल करतात की नाही हे पाहणे बाकी आहे. दरात वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवली जातेय. गेल्या अनेक दिवसापासून गॅसच्या दरात वाढ होण्याच्या चर्चा सुरु आहेत. तशी शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्यामुळं नवीन वर्षाच्या गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. यामुळं गृहणींचं बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना मोठी भेट

भारतीय रिझर्व्ह बँकेने नववर्षानिमित्त शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. रिझर्व्ह बँकेने शेतकऱ्यांना हमीशिवाय कर्ज देण्याची मर्यादा 2 लाख रुपये केली आहे. यापूर्वी ही मर्यादा 1.60 लाख रुपये होती. दरम्यान, निर्णयाचा देशातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. विशेष छोट्या शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे.

अधिक पाहा..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.