एका मुलीने सर्वात तरुण कर्मचारी म्हणून कंपनीत काम करण्यास सुरुवात केली, परंतु काही दिवसांनी मुलीला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. या मागचे कारण जाणून मुलीला आश्चर्य वाटले. याबाबत तरुणीने न्यायालयात दावा दाखल केला. कंपनीने न्यायालयासमोर अनेक स्पष्टीकरणे सादर केली परंतु एकही ऐकले नाही आणि मुलीला 30 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले.
काय आहे हे प्रकरण-
एका 20 वर्षीय मुलीला कामाच्या ठिकाणी स्पोर्ट्स शूज परिधान केल्याबद्दल कामावरून काढण्यात आले. एलिझाबेथ बेनासी असे या मुलीचे नाव आहे. या मुलीने 2022 मध्ये मॅक्सिमस यूके सर्व्हिसेसमध्ये काम करण्यास सुरुवात केली, परंतु तिला काढण्यात आले. बेनासीने सांगितले की तिला कंपनीचा कोणताही ड्रेस कोड आहे हे माहित नव्हते.
यासोबतच आपल्याला अन्यायकारकरित्या टार्गेट करून नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.एलिझाबेथ बेनासी म्हणाली की शूजमुळे तिला अयोग्यरित्या लक्ष्य करण्यात आले होते,मात्र तिच्या इतरसहकाऱ्यांनी देखील असेच शूज परिधान करून देखील ते वाचले. बेनासीने कंपनीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.
रिक्रूटमेंट एजन्सीने सांगितले की, बेनासी यांना केवळ तीन महिन्यांसाठी कामावर घेण्यात आले होते, त्यामुळे त्यांना नोकरीतून काढून टाकण्यात आले. ती सर्वात तरुण कर्मचारी होती, म्हणून तिला "मायक्रोमॅनेज" केले जात होते. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर दक्षिण लंडनमधील क्रॉयडन येथील कामगार न्यायालयाने एलिझाबेथ बेनासी यांच्या बाजूने निकाल दिला.
न्यायालयाने कंपनीला सांगितले की जर तुम्ही तिला फक्त तीन महिन्यांसाठी कामावर ठेवले आहे तर तास उल्लेख ईमेल मध्ये करायला हवा होता. न्यायालयाने तिच्या बाजूने निकाल दिला.आणि कंपनीला नुकसान भरपाई देण्यास सांगितले आहे.
Edited By - Priya Dixit