Pune CNG Price Hike: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात CNGच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. एमएनजीएलने सीएनजीच्या दरांमध्ये 1.10 रुपये प्रति किलो वाढ केली आहे. पूर्वी 87.90 प्रति किलो रुपयांना मिळणाऱ्या सीएनजी साठी आता 89 रुपये मोजावे लागणार आहे. आता पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सीएनजीसाठी आजपासून 89 रुपये मोजावे लागणार आहेत.
आजपासून नवीन दर लागू
पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (MNGL) सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 1.10 रुपयांची वाढ केली आहे. आता CNG साठी 89 रुपये मोजावे लागणार आहे. हे नवीन आजपासून लागू झाले आहेत. या दरवाढीमुळे सीएनजी कार असणाऱ्या वाहनधारकांचा आर्थिक खर्च वाढणार आहे. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
CNG च्या दरात का वाढ झाली?
CNG च्या दरात वाढ होण्यामागे आतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूच्या किमतीत झालेली वाढ हे कारण असल्याचे बोलले जात आहे. जागतिक बाजारात नैसर्गिक वायू चढ्या दराने खरेदी करावा लागत आहे. यानंतर सरकारला करही द्यावा लागते त्यामुळे दर वाढवण्यात येत असल्याची माहिती MNGL ने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
रिक्षाचे भाडे वाढणार?
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात जवळपास सर्व रिक्षा सीएनजीवर चालतात. यामुळे आता रिक्षाच्या दरातही वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याचा फटका केवळ वाहनचालकांना नव्हे तर सर्वसामान्या पुणेकरांनाही बसणार आहे. त्यामुळे सरकारने CNG च्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.
सीएनजीचे फायदे
सीएनजी गॅसोलीन आणि डिझेलपेक्षा क्लिनर बर्न करते. यामुळे कार्बन मोनोऑक्साइड उत्सर्जन सुमारे 80% कमी होते. गॅसोलीन आणि डिझेल वाहनांपेक्षा सीएनजी वाहने देखील शांतपणे चालतात, ज्यामुळे ध्वनी प्रदूषण कमी होते. तसेच CNG इतर इंधनांपेक्षा कमी ज्वलनशील आहे. तसेच गॅसोलीन किंवा डिझेलच्या तुलनेत सीएनजी इंजिनसाठी फायदेशीर आहे, यामुळे इंजिनचे आयुष्य वाढते. तसेच सीएनजी कमी खर्चात चांगले मायलेज देते. त्यामुळे सध्या अनेक लोक CNG वाहने वापरत आहेत.