झारखंडच्या हजारीबागमध्ये विहिरीतून माणसाला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात तीन जण जखमीदौसा येथील माहुखेडा गावात वाघाच्या हल्ल्यात तीन जण जखमी; घटनास्थळी वन अधिकारी, पोलीस व जिल्हा प्रशासन उपस्थित; वाघाला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत
Nagpur Crime: जन्मदात्या आई-वडिलांची मुलानेच केली हत्यानागपुरातील कपिल नगर पोलीस स्टेशन अंतर्गत खसारा परिसरामध्ये मुलानेच जन्मदात्या आई-वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. 26 डिसेंबरची घटना, घरात दुर्गंधी सुटल्याने घटना उघडकीस आली.
Ayodhya Live : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अयोध्येतील राम मंदिरात भाविकांची तुफान गर्दीबीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी सरकारनं एसआयटी स्थापन केली आहे. त्यामुळं आता या प्रकरणाच्या तपासाला वेग येणार आहे.
Gadchiroli Live: नव्या पिढीनं नक्षलवाद नाकारला आहे आणि संविधानाचा स्वीकार केला आहे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- गेल्या ४ वर्षांपासून नक्षलवादी चळवळीत कोणत्याही युवक-युवतींनं सहभाग घेतलेला नाही.
- नव्या पिढीनं नक्षलवाद नाकारला आहे आणि संविधानाचा स्वीकार केला आहे. हे माओवाद संपल्याचं निदर्शक आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
Gadchiroli Live: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीतील रस्ते आणि ताडगुडा पुलाची केली पाहणी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीतील गट्टा-गर्देवाडा-तोडगट्टा-वांगेतुरी रस्ता आणि ताडगुडा पुलाची केली पाहणी.
Ashish Shelar Live: माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री आशिष शेलार यांनी घेतली आढावा बैठक- माहिती आणि तंत्रज्ञान विभागातील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री आशिष शेलार यांनी घेतली आढावा बैठक
- कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्रानं दिशादर्शक व्हावं यासाठी राज्याचं पहिलं एआय धोरण तयार करण्याचे दिले निर्देश
मनालीत बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची अलोट गर्दीमनालीत बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे.
संरक्षण क्षेत्रात चालू असलेल्या आणि भविष्यातील सुधारणांना चालना देण्यासाठी संरक्षण मंत्रालयानं 2025 हे सुधारणांचं वर्ष म्हणून केलं घोषितसंरक्षण क्षेत्रात चालू असलेल्या आणि भविष्यातील सुधारणांना चालना देण्यासाठी संरक्षण मंत्रालयानं 2025 हे सुधारणांचं वर्ष म्हणून केलं घोषित. नववर्षाच्या पूर्वसंध्येला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सर्व सचिवांसह महत्त्वपूर्ण बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं.
Delhi CM Live Updates: भाजप दिल्लीच्या विविध भागात मंदिरे आणि बौद्ध मंदिरे पाडण्याचा विचार करत आहे; दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा आरोपदिल्लीच्या मुख्यमंत्री आतिषी म्हणाल्या की, "भाजप दिल्लीच्या विविध भागात मंदिरे आणि बौद्ध मंदिरे पाडण्याचा विचार करत आहे. एक धार्मिक समिती आहे जी मंदिरे स्थलांतरित करणे किंवा ते पाडणे यावर निर्णय घेते... ते गृहखात्याच्या अंतर्गत येत आहे. दिल्ली सरकारचे मंत्री गेल्या वर्षीपर्यंत या समितीचे सर्व निर्णय आधी गृहमंत्र्यांसमोर ठेवले जात होते आणि त्यांच्या मंजुरीनंतरच कारवाई केली जात होती.''
Dhananjay Munde Live Updates: धान्य आणि भरड धान्य खरेदी अंतर्गत किमान आधारभूत किंमत खरेदीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणीची मुदत वाढवलीधान्य आणि भरड धान्य खरेदी अंतर्गत किमान आधारभूत किंमत खरेदीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणीची मुदत १५ जानेवारी २०२५ पर्यंत वाढवण्यात आली धान उत्पादक शेतकऱ्यांनी नजीकच्या केंद्रामधून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी - माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे
Devendra Fadnavis Live : महाराष्ट्र लवकरच माओवाद मुक्त करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससर्वसामान्य लोकांचा माओवादावर विश्वास राहिलेला नाही. तसेच लवकरच महाराष्ट्र माओवादमुक्त करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. ते गडचिरोलीत बोलत होते.
Beed Live : पोलिस अधिक्षकांच्या मध्यस्थीनंतर मस्साजोग ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन मागेसरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी 22 दिवसांपासून मोकाट असल्याने गावक-यांनी जलसमाधी आंदोलन सुरु केले होते आंदोलनस्थळी तहसीलदारांनंतर आता जिल्हा पोलिस अधिक्षक देखील पोहचले . त्यांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले आहे.
Beed Live : मस्साजोगमध्ये जलसमाधी आंदोलन करणा-या महिलांची प्रकृती खालावलीसरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी 22 दिवसांपासून मोकाट असल्याने गावक-यांनी जलसमाधी आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनस्थळी तहसीलदारांनंतर आता जिल्हा पोलिस अधिक्षक देखील पोहचले आहेत. दरम्यान जलसमाधी आंदोलन करणा-या महिलांची प्रकृती खालावली आहे.
Beed Live : मस्साजोगमधील जलसमाधी आंदोलनस्थळी पोलिस अधिक्षक पोहचलेसरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी 22 दिवसांपासून मोकाट असल्याने गावक-यांनी जलसमाधी आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनस्थळी तहसीलदारांनंतर आता जिल्हा पोलिस अधिक्षक देखील पोहचले आहेत.
Solapur Live : मैदर्गीजवळ ट्रक आणि स्काॅर्पियोचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू , 8 गंभीर जखमीनवीन वर्षी देवदर्शनासाठी निघालेल्या नांदेडच्या भाविकांची स्कॉर्पिओ आणि ट्रकचा मैदर्गीजवळ भीषण अपघात झाला. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यामध्ये दोन महिला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे.
Live : खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या सीआयडी चौकशीला सुरुवातखंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड यांची सीआयडी कडून चौकशीला सुरुवात..
- वरिष्ठ सी आयडीचे अधिकारी करत आहेत चौकशी.
- खंडणी प्रकरणातील फरार असलेला आरोपी संदर्भात सीआयडी कडून विचारणा..
- आज दिवसभर सीआयडी कडून होणार चौकशी. कोण कोणते विषय उलगडणार हे पाहणं महत्त्वाचं..
Live : कोरेगाव भीमा परिसरात सीसीटिव्ही ची करडी नजरकोरेगाव भिमा येथे विजयस्तंभावर आज २०७ वा शौर्यदिन साजरा होतोय या निमित्ताने लाखोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायी कोरेगाव भिमात दाखल होत असुन चोरीच्या घटना टाळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पुणे नगर मार्गासह विजयस्तंभ परिसरात सीसीटिव्ही कँमेराच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जातेय चोरी,कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलीस अलर्टमोडवर आहे
Live : मस्साजोगमध्ये ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन; देशमुख हत्याकांडातील आरोपींच्या अटकेची मागणीमस्साजोगमध्ये ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन
संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींच्या अटकेची मागणी
Live : संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी सीआयडीचा फोकस आता सुदर्शन घुलेवरबीड : सीआयडीचा फोकस आता सुदर्शन घुले वर
सुदर्शन घुले हा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी
खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपीच्या CID मुसक्या आवळणार
सुदर्शन घुले हा महाराष्ट्रातच असण्याची शक्यता आहे तर कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे दोन आरोपी राज्याबाहेर असल्याचा संशय
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघे जण फरार आहेत.
वाल्मीक कराडच्या नंतर तपास यंत्रणांचा फोकस तीन फरार आरोपीवर
Live : भांडुपमध्ये जंगल-मंगल रोडवरील दूध केंद्राला आगभांडुप जंगल मंगल रोड वरील दूध केंद्राला आग
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नतीमहाराष्ट्र शासनानं आज काही अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश जारी केले. तर, काही अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. सचिनद्र प्रताप सिंह यांची आयुक्त,शिक्षण पुणे येथे नियुक्ती करण्यात आलीय. रुचेश जयवंशी यांना पदोन्नती देण्यात आली आहे. ते सध्या राष्ट्रीय ग्रामीण जीवनन्नोती अभियान, येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणन कार्यरत होते. त्यांना अल्पसंख्यांक विभास विभाग, मंत्रालय मुंबईचे सचिव पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.
Koregaon Live: कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, 8 ते 10 लाख अनुयायी येण्याचा अंदाजपुण्यातील कोरेगाव भीमा येथे आज 207 वा शौर्यदिन साजरा केला जाणार आहे. शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमा येथे जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंगळवार 31 डिसेंबर व बुधवार 1 जानेवारी असे दोन दिवस होणार१या या सोहळ्यसाठी यंदा लाखोंची उपस्थिती राहणार असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. यावर्षी कोरेगाव भीमा सभेसाठी पाच हजार पोलीस कर्मचारी,सातशे पन्नास पोलिस आधिकारी तैनात असणार आहेत. यासोबतच एक हजार होमगार्ड आणि आठ कंपन्या काम करणार.
Shaurya Din Bhima Koregaon LIVE : कोल्हापुरात भीमा कोरेगावमधील हुतात्म्यांना अभिवादनकोल्हापूर : भीमा कोरेगाव येथील युद्धात अनेकांनी आपल्या जीवाची आहुती दिली. त्या हुतात्म्यांना फुले, शाहू, आंबेडकर चळवळीच्या वतीने आज बिंदू चौक येथे निवृत्त पोलिस अधिकारी शमशुद्दीन मुश्रीफ व तानाजी नलवडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मानवंदना देण्यात आली. कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक लढाईतील जवानांचे वंशज सुभाष इनामदार यांच्या हस्ते बिंदू चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या प्रतिमांना हार अर्पण करून व २०७ मेणबत्त्या प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले.
LPG Price : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना मोठा दिलासा; एलपीजी सिलिंडरच्या दरात कपातLPG Gas Cylinder New Rate : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एक जानेवारी रोहित व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. एलपीजी व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीमध्ये 14.50 रुपयांची घट झाली आहे. 19 किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १४.५० रूपये कपात करण्यात आली आहे. तर, 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
Ayodhya, Uttar Pradesh LIVE : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अयोध्येत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दीअयोध्येत 2025 च्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने भाविक श्री रामजन्मभूमी मंदिरात दर्शनासाठी येत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन वर्ष 2025 निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. "हे वर्ष प्रत्येकासाठी नवीन संधी, यश आणि आनंद घेऊन येवो. प्रत्येकाला उत्कृष्ट आरोग्य आणि समृद्धीचा आशीर्वाद मिळो, असं पंतप्रधान मोदींनी ट्वीट केलं आहे.
केज : वाल्मीक कराड याला येथील सत्र न्यायालयाने १४ जानेवारीपर्यंत ‘सीआयडी’ कोठडी सुनावली. गुन्हा दाखल झाल्यानंतर फरारी असलेला कराड २१ दिवसांनी पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात मंगळवारी शरण आला. त्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई करून रात्री दहाच्या सुमारास केज पोलिस ठाण्यात आणले. पोलिस ठाणे परिसरात मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी ती पांगवली. परिसरात मोठा बंदोबस्त तैनात होता. उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्याला न्यायालयात आणण्यात आले. न्यायाधीश एस. वाय. पावसकर यांच्यासमोर सुनावणी झाली. ‘सीआयडी’चे वकील ॲड. जे. बी. शिंदे यांनी बाजू मांडली. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी खंडणी प्रकरणाचा संबंध आहे. त्याच्या तपासासाठी कराडला पंधरा दिवसांची कोठडी देण्याची मागणी शिंदे यांनी केली. कराड याच्याकडून ॲड. अशोक कवडे यांनी बाजू मांडली. दरम्यान, सरकारी वकील ॲड. देशपांडे यांनी वैयक्तिक कारण देत ऐनवेळी या प्रकरणाच्या सुनवणीतून माघार घेतली. त्यामुळे ॲड. शिंदे यांनी बाजू मांडली.
Adv. Prakash Ambedkar LIVE : कोरेगाव भीमा येथे अॅड. प्रकाश आंबेडकरांनी केलं शौर्य स्तंभाला अभिवादनकोरेगाव भीमा येथे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शौर्य स्तंभाला अभिवादन केले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक जानेवारी रोजी अभिवादनासाठी मी आलो आहे. सर्व जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. अभिवादन करण्यासाठी आजही जनता येत असते, ही गोष्ट चांगली आहे. सरकार आपल्या परीने सुविधा पुरवत असते, पण या अपुऱ्या पडत आहेत. पुढच्या वेळी या सुविधा पुरवल्या जातील अशी अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.
Minister Bharat Gogawale LIVE : मंत्री भरत गोगावले कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावरLatest Marathi Live Updates 1 January 2025 : कोरगाव भीमा येथे आज शोर्य दिन साजरा होत आहे. ‘झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे, जीवनगाणे गातच जावे...’ असे आनंदगीत गात मंगळवारी रात्री नागरिकांनी जल्लोषात नववर्षाचे स्वागत केले. तसेच बीड जिल्ह्यातील केज पोलिस ठाण्यात दाखल दोन कोटींच्या खंडणीच्या गुन्ह्यात काही दिवसांपासून फरार असलेला वाल्मीक कराड अखेर राज्य गुन्हे अन्वेषणच्या (सीआयडी) पुण्यातील मुख्यालयात मंगळवारी दुपारी हजर झाला. त्याला केज येथे नेत न्यायालयात हजर करण्यात आले. राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांचे मंगळवारी सायंकाळी कोल्हापुरात आगमन झाले. आज ते करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत. तसेच राज्यात काही ठिकाणी गारपीट झाली आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..