Eel and Heron Video: सध्या एका व्हायरल फोटोने सर्वांचीच झोप उडवून दिली आहे. यावेळी एका पक्ष्याच्या पोटातून चक्क एक सापासारखा मासा त्याचे पोट फाडून बाहेर येताना दिसतो आहे. हा थरारक फोटो पाहून सगळ्यांचीच झोप उडाली आहे. जगातील सर्व जीव एकमेकांचे अन्न आहेत, पोटासाठी ते अवलंबून आहेत. गरूड समुद्रात पोहणाऱ्या माशांवर लक्ष ठेवतात तर सिंह जंगलावर राज्य करतात. त्यातून त्यांच्या शिकारीतून वाचण्यासाठी हे प्राणी जिवाच्या आकांताने प्रयत्न करतात.
सध्या आपण ज्या फोटोबद्दल बोलत आहोत तो फोटो एक्सवर व्हायरल झाला आहे आणि त्याला 26 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हेरॉन पक्ष्याने ईल (मासा) गिळला होता आणि हजारो फूट आकाशात नेऊन त्याला खाल्ले. परंतु हा मासा गिळला जरी असला तरीसुद्धा या माशाने पक्ष्याच्या पोटातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला आणि चक्क त्याचे पोट फोडून तो बाहेर आला. एका छायाचित्रकाराने हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आणि सोशल मीडियावर शेअर केले आणि व्हायरल झाले.
या फोटोमध्ये ईल पक्षी हेरॉनच्या पोटातून बाहेर पडताना दिसत आहे आणि हेरॉन आपले पाय मागे घेऊन हवेत उडताना दिसत आहे. एका युजरने या फोटोवर लिहिले आहे की, ''माश्याने हेरॉनचे पोट कसे कापले?'' दुसरा वापरकर्ता लिहितो, ''पक्षी मेला की नाही?... संपूर्ण गोष्ट सांगा''. तिसऱ्या यूजरने लिहिले आहे की, ''हे चित्र, त्याचे भाव वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.. ते पेंटिंग बनवायला हवे'' सोशल मीडियावर सध्या हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकदा जंगलात राहणाऱ्या पक्ष्यांचे, प्राण्यांचे शिकार करतानाचे धक्कादायक फोटो, व्हिडीओ हे समोर येताना दिसतात. ते पाहून आपले मनंही हेलावून जाते.