आयर्लंडचा दारूण पराभव केल्यानंतर कर्णधार स्मृती मंधानाने मांडलं गणित, म्हणाली..
GH News January 10, 2025 11:10 PM

वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात आयर्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि फलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय चुकला असंच म्हणावं लागेल. कारण आयर्लंडने दिलेलं आव्हान भारताने 93 चेंडू आणि 6 गडी राखून पूर्ण केलं. आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 गडी गमवून 238 धावा केल्या आणि विजयासाठी 239 धावांचं आव्हान दिलं. आयर्लंडकडून कर्णधार गॅबी लेविसने जबरदस्त खेळी केली. तिने 129 चेंडूत 15 चौकारांच्या मदतीने 92 धावा केल्या. पण तिचं शतक 8 धावांनी हुकलं. दीप्ती शर्माने तिला बाद करत तंबूत पाठवलं. आयर्लंडने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी भारताकडून स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल ही जोडी आली होती. या दोघांनी जबर सुरुवात करुन दिली. पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. स्मृती मंधाना 41 धावांवर असातना बाद झाली. तर प्रतिका रावलने 96 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकार मारत 89 धावा केल्या. तर तेजल हसबनीस हीने नाबाद 53 धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. या विजयानंतर कर्णधार स्मृती मंधाना हीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

टीम इंडियाची कर्णधार स्मृती मंधाना हीने सांगितलं की, ‘या विकेट्सवर गोलंदाजी करण्यासाठी, गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. क्षेत्ररक्षणात चांगली कामगिरी करण्याची गरज आहे. आमच्या फलंदाजांसाठी खरोखर आनंदी आहे. तेजलने चांगली कामगिरी केली. गेल्या काही दिवसांपासून आमच्यात चांगली चर्चा झाली. योग्य गोलंदाजांना जाणून घेणे खरोखर महत्त्वाचे आहे. आमच्यासाठी एक परिपूर्ण दिवस होता. आम्ही त्यांना 180 पर्यंत मर्यादित ठेवायला हवे होते, पुढे ते करण्याचे आमचे ध्येय आहे. आम्हाला पुढे येत आमच्या योजना अंमलात आणाव्या लागतील, ते महत्वाचे आहे. आपण पडद्यामागे केलेल्या गोष्टींमुळे सामने जिंकले जातात. आपल्या नित्यक्रमाला चिकटून राहण्याची आणि सर्व योग्य गोष्टी करण्याची गरज आहे.’

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मंधाना (कर्णधार ), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्स, तेजल हसबनीस, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, सायली सातघरे, सायमा ठाकोर, प्रिया मिश्रा, तीतस साधू.

आयर्लंड महिला (प्लेइंग इलेव्हन): सारा फोर्ब्स, गेबी लुईस (कर्णधार), उना रेमंड-होई, ओरला प्रेंडरगास्ट, लॉरा डेलेनी, लेआ पॉल, कुल्टर रेली (विकेटकीपर), आर्लेन केली, जॉर्जिना डेम्पसी, फ्रेया सार्जेंट, एमी मॅग्वायर

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.