वूमन्स टीम इंडियाची स्टार आणि ओपनर बॅट्समन स्मृती मंधाना हीने धमाका केला आहे. स्मृतीने आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात धमाका केला आहे. स्मृतीने आयर्लंडविरुद्ध 239 धावांचा पाठलाग करताना 41 धावांची खेळी केली. स्मृतीने 29 बॉलमध्ये 6 फोर आणि 1 सिक्ससह 141.38 च्या स्ट्राईक रेटने 41 धावा केल्या. स्मृतीने या खेळीसह मोठा विक्रम उद्धवस्त केला आहे. स्मृती मंधाना वूमन्स क्रिकेटमच्या इतिहासात एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान 4 हजार धावा करणारी खेळाडू ठरली आहेत. स्मृतीने यासह माजी कर्णधार मिताली राज हीचा विक्रम मोडीत काढला.
स्मृती मंधाना ही एकदिवसीय क्रिकेटमध्ये 4 हजार धावा करणारी एकूण 15 वी महिला ठरली आहे. तसेच स्मृती मिताली राज हीच्यानंतर 4 हजार धावांचा टप्पा गाठणारी दुसरीच भारतीय महिला फलंदाज ठरली आहे. स्मृतीने मितालीच्या तुलनेत फार आधी ही कामगिरी करुन दाखवली आहे. स्मृतीने नवव्या ओव्हरमध्ये एक धाव धेत ही कामगिरी केली.
दरम्यान कर्णधार गॅबी लुईस हीने 92 धावा केल्या. तर लेह पॉल हीने 59 धावांचं योगदान दिलं. या दोघींच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर आयर्लंडने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 238 धावा केल्या. टीम इंडियाने हे आव्हान 34.3 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. टीम इंडियाने हा सामना 6 विकेट्सने जिंकला. टीम इंडियासाठी प्रतिका रावल हीने सर्वाधिक 89 धावांचं योगदान दिलं. तर तेजल हसबनीस हीने 53 धावांनी नाबद अर्धशतकी खेळी केली. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
स्मृतीच्या वनडे क्रिकेटमध्ये 4 हजार धावा
आयर्लंड वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : गॅबी लुईस (कर्णधार), सारा फोर्ब्स, उना रेमंड-होई, ओरला प्रेंडरगास्ट, लॉरा डेलेनी, लेह पॉल, कुल्टर रेली (विकेटकीपर), आर्लेन केली, जॉर्जिना डेम्पसे, फ्रेया सार्जेंट आणि एमी मॅग्वायर.
इंडिया वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : स्मृती मंधाना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्स, तेजल हसबनीस, ऋचा घोष (विकेटकीपर), सायली सातघरे, सायमा ठाकोर, प्रिया मिश्रा आणि तीतस साधू.