कुर्डू : कुर्डू येथे अज्ञात चार चोरट्याने चार जणांच्या घरी चोरी करून सुमारे पावणे दोन लाखांची चोरी केल्याची घटना १०जानेवारी गुरुवारी पहाटे ३ च्या सुमारास आज घडली या घटनेची फिर्याद प्रशांत राजाराम दळवी रा.कुर्डू वय 27 यांनी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात दिली असून अज्ञात चोरट्या विरुद्ध कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
खडखड केल्याचा आवाज येत असल्याने मी उठुन आमचे घरातील पाठिमागील खोलीत जावुन पाहिले त्यावेळी चार अनोळखी इसम आमच्या घरातील पेटीतील व इतर सामान विस्कटत होते. त्यावेळी त्यांनी माझेजवळ येवुन ओरडलास तर तुला जिवे मारतो आसा दम देऊन त्यांचेपैकी एक जणाचे जवळ हत्यार होते त्यामुळे मी आरडाओरड केली नाही मी जागीच उभा होतो.
त्यावेळी त्यांनी आमचे घरातील पत्त्याची पेटी घेवुन अंधाराचा फायदा घेत पळून गेले.त्यांनी १६४०००/-रुपये किंमती चे सोन्याचे दागिने चोरीला गेले. आमचे गावातील हिंमत हमजान शेख, रामचंद्र विठ्ठल हांडे, भारत दशरथ झुंडरे सर्व रा कुई ता माढा व सुनिता कुंदन लोंढे, सुजाता मधुकर गायकवाड दोघे रा कुडूवाडी करमाळा रोड कुडूवाडी, यांच्या ही घरातील सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याचे समजले.
घटनास्थळाला पोलिसांनी स्वयं पथक व असे ठसे तज्ञासह भेट देऊन पाहणी केली . पुढील तपास पोलीस करत आहेत.