Walmik Karad son News : संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणामुळे वाल्मिक कराड याचं नाव राज्यभरात चर्चेत आहे. खंडणीच्या आरोपाखाली वाल्मिक कराड सध्या पोलीस कोठडीत आहे. वाल्मिक कराड याचे अनेक पराक्रम बाहेर आले आहेत. त्यातच आता वाल्मिक कराड याच्या मुलावरही गंभीर आरोप करण्यात आलाय. बंदुकीचा धाक दाखवत प्लॉट आणि सोनं ताब्यात घेतल्याचा आरोप वाल्मिक कराड याच्या मुलावर झालाय. पिडीत महिलेने सोलापूर कोर्टात वाल्मिक कराड याच्या मुलाविरोधात धाव घेतली आहे.
वाल्मिक कराड याचा मुलगा संतोष कराड अडचणीत सापडला आहे. वडिलानंतर आता मुलाचे पाय खोलात गेल्याची चर्चा आहे. वाल्मिक कराडच्या मुलावर सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात खासगी फिर्याद दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. सुशील कराडने त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून रिव्हॉल्वरचा धाक दाखवून दोन बल्कर ट्रक, दोन कार, परळीतील प्लॉट आणि सोने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आलाय.
सुशील वाल्मीक कराडसह त्याचे मित्र अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार यांच्याविरुद्ध ही खासगी फिर्याद दाखल करून घेण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे. मॅनेजरच्या पत्नीने याबाबत सोलापुरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन, सोलापूर पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडे तक्रार दिली आहे. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही.
पोलिसांनी तक्रार न घेतल्यामुळे मॅनेजरच्या पत्नीने कोर्टाते दार ठोठावले आहे. पीडित महिलेने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली आहे. त्यावर आरोपींनी त्यांचे म्हणणे दाखल केले असून 13 जानेवारी रोजी याबाबत सुनावणी होणार आहे. सुशील कराडवर केलेल्या आरोपबाबत सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय काय निर्णय देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मीडिया अन् सोशल मिडीयावरील बातम्यावरून पंकजा मुंडेंचे मोठे विधान...
आजच्या मीडिया अन् सोशल मिडीयावरील बातम्यावरून मंत्री पंकजा मुंडे यांनी मोठे विधान केले आहे. त्या म्हणाल्या, की आजच्या मीडियाच्या काळात, सोशल मीडियाच्या काळात, कोणीही युट्युब चॅनेल काढून आज कसल्याही बातम्या करत आहे, कोणाचेही चारित्र्य हनन करून कोणाविषयी काहीही बोलत असते. पण शेवटी सत्य हे इतकं प्रखर तेजस्वी असतं, प्रखर असत ते बाहेर येत असतं.अशा वेळी राजकीय जीवनात काम करताना, लोकांनी आम्ही केलेल्या चांगल्या कामाची आठवण ठेवावी.. असंही यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. त्या बीडच्या अंबाजोगाई शहरात एका कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या.