Maharashtra Live Updates : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत संजय राऊत यांचं मोठं विधान
Sarkarnama January 11, 2025 03:45 PM
Sanjay Raut : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत संजय राऊत यांचं मोठं विधान

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठं विधान केलं. संजय राऊत म्हणाले, "नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहोत. एकदा आम्हाला पाहायच आहेच, जे काही होईल ते होईल. कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतो".

Santosh Deshmukh Murder Case : तपासाची माहिती मिळत नाही, मयत संतोष देशमुख यांची कन्या वैभवींची खंत

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपास नेमका कोणत्या दिशेनं चालला आहे, याची माहिती मिळत नसल्याची खंत मयत संतोष देशमुख यांची कन्या वैभवी यांनी व्यक्त केली. 'या हत्येप्रकरणी नेमकं काय चाललं आहे. तपास कुठपर्यंत आला आहे, हे कळालं पाहिजे', अशी मागणी वैभवी देशमुख हिनं सरकारकडे केली आहे.

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्येचा खटला इतर जिल्ह्यात चालवा; आमदार कैलास पाटील यांची मागणी

बीड, परभणी घटनेवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे आमदार कैलास पाटलांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिकता दाखवून राजीनामा द्यायला हवा. संतोष देशमुख प्रकरणाचा खटला इतर जिल्ह्यात चालवा, तसेच आरोपीच्या सबंधित अधिकाऱ्यांना एसआयटीतून वगळण्याची मागणी आमदार देशमुख यांनी केली. या दोन्ही घटनेच्या निषेधार्थ धाराशिव इथं आज जनआक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे.

Washim Muk Morcha : संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घटनेच्या निषेधार्थ वाशिममध्ये मूक मोर्चा

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आणि परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ आज वाशिममध्ये मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चात संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख व त्यांचा मुलगा विराज देशमुख सहभागी होणार आहे.

Torres Company : ख्रिसमसच्या बहाण्यानं टोरेसचा संस्थापक देशाबाहेर पसार

टोरेसच्या मुख्य संस्थापकांपैकी एक ओलेना स्टोएना ही युक्रेनी महिला आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर आली असून, तिचा शोध सुरू करण्यात आला आहे. तसेच संस्थापक व्हिक्टोरिया कोवालेंकोसह अन्य पदाधिकारी ख्रिसमसचा बहाणा करत डिसेंबरअखेरीस देशाबाहेर पसार झाल्याचे चौकशीत समोर येत आहे. टोरेस प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेची छापेमारी सुरू असून आतापर्यंत तीन हजारांच्या आसपास खडे आणि पाच कोटी रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

Jaydeep Apte : अखेर जयदीप आपटेला जामीन मंजूर

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली होती. नौदल दिनानिमित्त 4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुर्णाकृती पुतळ्याच अनावरण झालं होतं. मात्र, अवघ्या आठ महिन्यात तो पुतळा कोसळला. त्यावरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यानंतपर या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेला काही पोलिसांनी अटक केली होती. तर याच आपटेचा शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.

Dharashiva Live News : धाराशिवमध्ये आज जनआक्रोश मोर्चा

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशिची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आणि देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी राज्यभरात जनआक्रोश मोर्चा काढला जात आहे. आज हा मोर्चा धाराशिवमध्ये काढण्यात येणार आहे.

HMPV Viras : HMPV ची लागण झालेले देशात 11 रुग्ण आढळले

चीन मध्ये थैमान घातलेल्या HMPV विषाणूने भारतात शिरकाव केला आहे. तर या विषाणूची लागण झालेले देशात 11 आढळल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये गुजरातमधील ८ वर्षाच्या मुलाला तर उत्तर प्रदेशमधील साठ वर्षाच्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.