ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा! माणिकराव कोकाटेंनी सगळंच काढलं; म्हणाले, ‘त्यांनी उघडं लढावं की कपडे
Marathi January 11, 2025 04:24 PM

संजय राऊत यांच्यावर माणिकराव कोकाटे : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) आत्मविश्वास बळावलेल्या महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) मोठा फटका बसला. यानंतर महाविकास आघाडीतील धुसफूस समोर येत आहे. नुकताच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिलाय. यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडल्याचे दिसून येत आहे. आता यावरून राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी संजय राऊत यांना जोरदार टोला लगावलाय.

संजय राऊत यांनी आज नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महानगरपालिका निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, मुंबईसह नागपूरपर्यंत आम्ही महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहोत. मग काय होईल ते होईल? एकदा आम्हाला आमची ताकद आजमावायचीच आहे. आम्ही महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. नागपूरला सुद्धा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. आम्हाला उद्धव ठाकरे यांनी याबाबत संकेत दिले आहेत. कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? कारण आघाडीत आणि विधानसभेत कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाला आणि पक्षाच्या वाढीला बसतो. महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपंचायतीमध्ये निवडणुका स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे लागतात, अशी घोषणा त्यांनी केली.

नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?

संजय राऊत यांच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. आता राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी संजय राऊत यांना जोरदार टोला लगावलाय. त्यांनी म्हटलंय की,  तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी काय करावे? कुणासोबत लढावे? कुणासोबत लढावे? उघडे लढावे की कपडे घालून लढावे,तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना जे योग्य वाटते आहे त्यांनी ते करावे, असे माणिकराव कोकाटे म्हणाले.

चर्चा करुन निर्णय घ्यायला हवा : जितेंद्र आव्हाड

संजय राऊत यांच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. ठाकरे गटाचा निर्णय झाला असेल तर थांबवणारे आम्ही कोण? राऊतांनी चर्चा करुन निर्णय घ्यायला हवा होता, अशी प्रतिक्रिया त्यांनी संजय राऊत यांच्या स्वबळाच्या नाऱ्यावर दिली आहे.

आणखी वाचा

ठाकरे गटाकडून निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआत काँग्रेसचा होकार, तर राष्ट्रवादीचा वेगळा सुर

Sharad Pawar: पवार काका-पुतणे एकाच व्यासपीठावर दिसणार! अनेक मंत्री, विविध राजकीय पक्षाचे नेते जमणार एकाच व्यासपीठावर, दोन्ही पवारांकडे राज्याचं लक्ष

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.