'बिग बॉस 18' चा (Bigg Boss 18) फिनाले आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कोण होणार 'बिग बॉस 18' चा विजेता हे जाणून घेण्यास प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. श्रुतिकानंतर बिग बॉसच्या घरातून चाहत पांडेचा पत्ता कट झाला आहे. तिच्या जाण्यामुळे घरातील अनेक सदस्यांना वाईट वाटले आहे. चाहतचा बिग बॉसचा प्रवास खूप रंजक होता. आता बिग बॉसच्या घराबाहेर आल्यावर तिने घरातील सदस्यांविषयी मोठे खुलासे केले आहे.
मुलाखतीत सांगितले की, जर मी आज बिग बॉसच्या घरातून बाहेर गेली नसती. तर नक्कीच ईशाला घर सोडावे लागले असते. कारण बिग बॉसच्या घरात अविनाशशिवाय ईशाचे अस्तित्व नाही. ईशाने अविनाशला आपला नोकर म्हणून ठेवले आहे.
शिल्पा शिरोडकरचाहतने मुलाखतीत शिल्पाविषयी सांगितले की, त्या सध्या खूप आहेत.
अविनाश मिश्राअविनाशबद्दल बोलताना चाहत बोली की, अविनाशने घरात माझ्याबद्दल खूप चुकीच्या गोष्टी बोलल्या आहेत. जेव्हा तुम्ही असे एखाद्या मुलीला बोलता तेव्हा तुमच्याही बहिणीचा विचार करा. अनेक वेळा चाहतच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले होते.
करणवीर मेहरामेहरा विषयी बोलताना चाहत म्हणाली की, त्याने माझ्या अश्रूंना मगरमच्छ के आंसू बोला आहे. जेव्हा तुम्ही वारंवार रडता तेव्हा लोक तुम्हाला हलक्यात घेतात.
चाहत विजेत्याबद्दल बोलताना म्हणाली की, "करणवीर मेहरा आणि चुम दरांग विजेता व्हायला पाहिजे. विशेषता चुम दरांगाने 'बिग बॉस 18' ची ट्रॉफी उचलली पाहिजे. तिने कोणाच्याही मदतीशिवाय इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे."
'बिग बॉस 18' फिनाले 19 तारखेला रविवारी होणार आहे. आता बिग बॉसच्या घरात 7 सदस्य आहेत. यात अविनाश मिश्रा, विवियन डीसेना, रजत दलाल , करणवीर मेहरा, ईशा सिंह, शिल्पा शिरोडकर आणि चुम दरांग यांचा समावेश आहे. यांपैकी बिग बॉसची ट्रॉफी कोण उचलणार आणि कोण घराबाहेर जाणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.