ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अपवाद वगळता टीम इंडियाच्या खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली. टीम इंडियाच्या या कामगिरीचं रीव्हीव्यू करण्यात आला. या रिव्हीव्यू मिटींगमध्ये कर्णधार रोहित शर्मा, हेड कोच गौतम गंभीर आणि अजित आगरकर हे उपस्थित होते. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, या बैठकीत आणखी एका विषयावर चर्चा करण्यात आली. त्यानुसार खेळाडूंच्या कामगिरीनुसार त्यांना पैसे देण्यात यावे, या मुद्द्यावर चर्चा झाली. थोडक्यात काय तर जशी कामगिरी करणार त्यानुसारच मानधन मिळणार. रिपोर्टनुसार, खेळाडूंना रेड बॉल क्रिकेटमध्ये त्यांच्या कामगिरीची आणि भूमिकेची जाणीव व्हावी, हा या चर्चेमागचा उद्देश असल्याचं म्हटलं जात आहे.
रिपोर्टनुसार, जे खेळाडू त्यांच्या भूमिकेला न्याय देऊ शकणार नाहीत, त्यांना त्यांच्या कामगिरीनुसार पैसे मिळतील. थोडक्यात काय तर जशी कामगिरी तसा पैसा मिळेल.
रीव्हीव्यू मिटींगमध्ये झालेल्या चर्चेनुसार, एखाद्या खेळाडूला चांगली कामगिरी करता आली नाही तर त्याचा परिणाम हा त्याच्या कमाईवरही होईल. इंडियन एक्सप्रेसने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, या सूचनेमुळे खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होईल. जर खेळाडू त्याच्या भूमिकेला न्याय देण्यात अपयशी ठरला तर त्याचा परिणाम हा त्याला मिळणाऱ्या रक्कमेवरही होईल.
तर खेळाडूंना मोठा झटका
रिपोर्टनुसार, कामगिरीनुसारच खेळाडूंचं मानधन (व्हेरीएबल पे) ठरेल. बीसीसीआयने खेळाडूंचं कसोटी क्रिकेटकडे लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांना आकृ्ष्ठ करण्यासाठी इन्सेन्टिव्ह स्किम आणली होती. त्यानुसार, एखादा खेळाडू त्या हंगामातील एकूण पैकी 50 टक्के सामन्यांमधील प्लेइंग ईलेव्हनचा भाग असल्यास त्याला प्रत्येक मॅचसाठी 30 लाख रुपये रक्कम इन्सेन्टिव्ह म्हणून दिली जाईल. तसेच एखाद्या खेळाडूने 75 टक्के सामने खेळले असतील, तर त्याला 45 लाख रुपये देण्यात येतील.
दरम्यान भारतीय खेळाडूंना एका सामन्यासाठी 15 लाख रुपये दिले जातात. तसेच खेळाडूंना चांगल्या कामगिरीसाठी अधिकची रक्कम दिली जाते. आता खेळाडूंच्या वेतनातून आणि प्रोत्साहनपर मिळणाऱ्या रक्कमेतून पैसे कापले जाणार की नाहीत? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पराभवाची दखल बीसीसीआयने घेतलीय, हे यातून स्पष्ट झालंय इतकं मात्र खरं.