बाबाची लाडाची लेक! धावता धावता पडली अन् वडिलांच्या कुशीत शिरली; राहा आणि रणबीर कपूरचा क्यूट Video Viral
esakal January 15, 2025 06:45 PM

Latest Bollywood News: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात. आलिया कायम तिचे आणि कुटुंबियांचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. ती रणबीर आणि मुलगी राहासोबतचेही अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. तर दुसरीकडे चाहतेही राहाला पाहण्यासाठी उत्सुक असतात. तिचं वागणं आणि बोलणं पाहण्यासाठी नेटकरी आतुर असतात. अशातच तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर होतोय. ज्यात वडील आणि मुलीचं सुंदर नातं दिसतंय.

धावताना पडली राहा

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी याने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर आलिया आणि रणबीर यांचे दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यात आलिया कोर्टवर बॅड मिंटनचा सराव करताना दिसतेय. तर दुसरीकडे रणबीर आणि राहा खेळण्यात व्यग्र आहेत. आई खेळ खेळेपर्यंत रणबीर राहाची काळजी घेत होता. ती दोघं मस्ती करताना दिसतायत. राहा मध्येच रणबीरसोबत दिसतेय. तर मध्येच गवतावर धावताना दिसतेय. त्यातच धावताना राहा अडखळते आणि पडते. त्यानंतर ती पुन्हा उठते आणि वडिलांकडे धावत जाते.

रणबीर घेतोय लेकीची काळजी

राहा धावताना पडते. त्यानंतर ती स्वत:ला सावरतेआणि लगेच उठून रणबीरकडे जाते. तिथे गेल्यावर तिला आपल्या मांडीवर बसवतो आणि तिच्या पायावर फुंकर मारतो. तिच्या पायावरून हात फिरवतो. रणबीरसुद्धा आपल्याला मुलीला लागलं तर नाही ना हे नीट पाहतोय आणि तिची काळजी घेतो. राहा पडल्यावर लगेच रणबीरकडे जाते आणि तो देखील आपल्या मुलीची काळजी घेतोय हे पाहून नेटकरी त्यांच्यावर फिदा झालेत. त्यांच्यातील हे नातं पाहून अनेक जण त्यांचं कौतुक करत आहेत.

काही दिवसांपूर्वीच आलिया आणि रणबीर कुटुंबासह नवीन वर्षाच्या स्वागतासाठी थायलंडला गेले होते. तिथला व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. रणबीर सध्या त्याच्या रामायण सिनेमाचे शूटिंग करत आहे. या शिवाय लवकरच रणबीर आलिया लव्ह एण्ड वॉर या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. या सिनेमात त्यांच्यासोबत विकी कौशलसुद्धा असेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.