Goa News: अनधिकृत ओव्हरहेड इंटरनेट केबल्स हटवल्याने म्हापशात इंटरनेट सेवा विस्कळीत; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी
dainikgomantak January 19, 2025 02:45 AM
Mapusa News: अनधिकृत ओव्हरहेड इंटरनेट केबल्स हटवल्याने म्हापशात इंटरनेट सेवा विस्कळीत

गोवा वीज विभागानं विजेच्या खांबांवरील अनधिकृत ओव्हरहेड इंटरनेट केबल्स काढून टाकल्यामुळं शनिवारी (18 जानेवारी) म्हापशातील इंटरनेट सेवा विस्कळीत झाली. सध्या इंटरनेट कनेक्शनचं काम सुरु आहे.

Panjim Road: १८ जानेवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान पणजीतील ६ रस्ते तात्पुरते बंद

पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड (IPSCDL) ने १८ जानेवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान पणजीमधील ६ रस्ते तात्पुरते बंद करण्याची घोषणा केली आहे. डॉन बॉस्को स्कूल ते युको बँक, लिबर्टी शोरूम ते विनंती रेस्टॉरंट, कॅफे भोसले रोड ते डीबी रोड जंक्शन, एनजीपीडीए कल्व्हर्ट ते काकुलो आयलंड, विनंती रेस्टॉरंट ते डीबी रोड जंक्शन आणि ताड माड मंदिर ते एसटीपी ब्रिज, टोंका हे रस्ते बंद असणार आहेत.

Sadanand Shet Tanavade: 2027 च्या निवडणुकीसाठी 50% तयारी पूर्ण - सदानंद तानावडे

भाजपचा पुन्हा एकदा विजय सुनिश्चित करण्याचं ध्येय ठेवून, 2027 च्या निवडणुकीसाठी आम्ही 50% तयारी पूर्ण केली आहे, असं सदानंद शेट तानावडे म्हणालेत.

Goa Chicken Shortage: "गोव्यात येणाऱ्या चिकनची सतावणूक थांबवा", व्यवसायिकांची मागणी

राज्यातील चिकन व्यवसायिकांनी घेतली मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट. गोव्यात चिकन फार्मिंग नसल्याने बाहेरूनच चिकन येते. गोव्यातील तुटवडा लक्षात घेऊन हा गुंता सोडविण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे चिकन व्यवसायिकांनी केली.

Damu Naik: दामू नाईक भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

गेल्या काही दिवसांपासून गोव्याच्या राजकीय वर्तुळात भाजपच्या प्रदेशाध्यक्षाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार अशी चर्चा सुरु होती. मात्र आज शनिवारी पार पडलेल्या भाजप कार्यकारणीच्या बैठकीत दामू नाईक यांच्या नावावर प्रदेशाध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आला.

गोव्यात येणाऱ्या चिकनची सतावणूक थांबवा

गोव्यात चिकन फार्मिंग नाही, येथे बाहेरुनच चिकन येते. त्यांची सतावणूक करु नये. गोव्यातील तुटवडा लक्षात घेऊन हा गुंता सोडवावा. चिकन व्यवसायिकांची मागणी. गोव्यातील चिकन व्यवसायिकांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली.

Bainguinim Waste Plant: बायंगिणी येथील कचरा प्रकल्पाविरोधात स्थानिक आक्रमक; प्रकल्प रद्द करण्याची मागणी

बायंगिणी येथील कचरा प्रकल्पाविरोधात स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. सरकारनं हा प्रकल्प रद्द करावा. हा प्रकल्प आल्यास आम्ही सरकारविरुद्ध निषेध करू. आम्ही मागे हटणार नाहीत, असं कुंभारजुवा येथील स्थानिक नागरिकांनी म्हटलंय.

Amona Hit And Run: आमोणामध्ये हिट अँड रन! चारचाकी वाहनाची वृध्द व्यक्तीला धडक, उपचारादरम्यान मृत्यू

शुक्रवारी संध्याकाळी आमोणा पुलाजवळ एका चारचाकी वाहनाने वृध्द व्यक्तीला धडक दिल्याची माहिती समोर आलीय. धडक दिल्यानंतर वाहनचालकानं घटनास्थळावरून पळ काढला. अपघातानंतर वृध्द व्यक्तीला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली असून वाहन चालकाला अटक केली आहे.

कळंगुट पोलिसांची धडक कारवाई; 24 आरोपींवर गुन्हा दाखल

पर्यटकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी कळंगुट पोलिस स्टेशन बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करत आहे. आज त्यांनी २४ आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे, ज्यात ५ जणांना दलाली केल्याबद्दल, ११ जणांना सार्वजनिक उपद्रव निर्माण केल्याबद्दल आणि ८ जणांना भीक मागितल्याबद्दल पोलिसांकडून कारवाई करण्यात आली

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.