पंकजा मुंडे, जालना : राज्य सरकारने जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये कोल्हापूर आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांना एक पालकमंत्री आणि एक सहपालकमंत्री जाहीर करण्यात आलाय. मात्र, राज्याचे लक्ष असलेल्या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंचा (Dhananjay Munde) पालकमंत्रिपदापासून पत्ता कट झालाय. त्यांना कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलेलं नाही. मात्र, दुसरीकडे मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा बालेकिल्ला असलेल्या जालना जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे.
दरम्यान, राज्याचे अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पदापासून दूर ठेवण्यात आले आहे. वाल्मिक कराडवर मोक्का लागण्यापासून धनंजय मुंडेंच्या राजकीय अडचणी वाढल्या आहेत. त्यातच हा त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. दरम्यान, पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाल्यानंतर धनंजय मुंडे हे परळीहून शिर्डीकडे निघाले आहेत..उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये धनंजय मुंडे सहभागी होणार आहेत..बीडच्या पालकमंत्री पदाबाबत धनंजय मुंडे उद्या शिर्डीमध्ये प्रतिक्रिया देणार असल्याचे बोलले जात आहे.
बजरंग सोनवणे म्हणाले, बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. अजितदादा पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! बीड जिल्ह्यात पुनःश्च एकदा कायदा-सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी पालकमंत्र्यांनी योग्य ती पाऊले उचलतील हीच सर्वसामान्य बीडकरांची अपेक्षा आहे.
जयंत पाटील म्हणाले, बीडमधील जे प्रश्न आहेत, ते इतके जटील झाले आहेत ते पाहता अजित पवार यांनी तिथे स्वतः जाणे पसंत केले असेल. पालकमंत्रीपदाची जबाबदारी वाटण्याचे काम हे सत्तेत बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांचा असतो. कोणाला कुठला पालकमंत्री पद दिल यावर टीका टिपणी करण्यापेक्षा ज्याला जी जबाबदारी दिलेत ते कशा पद्धतीने पार पाडतात हे पाहूयात.
पालकमंत्र्यांची यादी
१. गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
2. ठाणे – एकनाथ शिंदे
3. मुंबई शहर – एकनाथ शिंदे
4. पुणे – अजित पवार
5. बीड – अजित पवार
6. नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
7. अमरावती चंद्रशेखर बावनकुळे
8. अहमदनगर – राधाकृष्ण विखे पाटील
9. वाशिम – हसन मुश्रीफ
10. सांगली – चंद्रकांत पाटील
11. नाशिक – गिरीश महाजन
12. पालघर – गणेश नाईक
13. जळगाव -गुलाबराव पाटील
14. यवतमाळ – संजय राठोड
15. मुंबई उपनगर – आशिष शेलार तर सहपालकमंत्री – मंगलप्रभात लोढा
16. रत्नागिरी – उदय सामंत
17. धुळे – जयकुमार रावल
18. जालना – पंकजा मुंडे
19. नांदेड – अतुल सावे
20. चंद्रपूर – अशोक उईके
21.सातारा – शंभूराज देसाई
22. रायगड – आदिती तटकरे
23.लातूर – शिवेंद्रराजे भोसले
24. नंदूरबार – माणिकराव कोकाटे
२५.सोलापूर – जयकुमार गोरे
26. हिंगोली – नरहरी झिरवाळ
27. भंडारा – संजय सावकारे
28. छत्रपती संभाजीनगर – संजय शिरसाट
29. धाराशिव – प्रताप सरनाईक
30. बुलढाणा – मकरंद जाधव
३१. सिंधुदुर्ग – नितेश राणे
32. अकोला – आकाश फुंडकर
33. गोंदिया -बाबासाहेब पाटील
३४. कोल्हापूर – प्रकाश आबिटकर तर सह पालकमंत्री – माधुरी मिसाळ
35. वर्धा – पंकज भोईर
३६.परभणी – मेघना बोर्डीकर
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..