सोने अन् चांदीच्या दरात घसरण की तेजी,मुंबईसह विविध शहरांतील दर जाणून घ्या?
Marathi January 22, 2025 02:24 PM

मुंबई : गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणून आणि दागिण्यांची खरेदी यासाठी अनेक जण सोने (Gold Rate Today) आणि चांदीचे दर (Silver Rate Today) किती रुपयांवर आहेत याची माहिती घेत असतात. सोने चांदीच्या दागिण्यांच्या खरेदीसाठी ते बाजारावर लक्ष टेवून असतात. भारतात सोन्याच्या दरात दररोज बदल होत असतात. सोने आणि चांदीच्या दरावर जागतिक बाजारांचा प्रभाव पडत असतो. याशिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती, सणांच्या काळातील आणि लग्नसराईतील वाढती मागणी याचा परिणाम देखील सोने आणि चांदीच्या दरावर होतो. अमेरिकेचे 47 वे अध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी जे भाषण केलं त्यामध्ये त्यांनी व्यापार आणि टॅरिफ संदर्भातील धोरण मांडलं. यानंतर सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं दिसून आलं.

22 जानेवारीचा सोन्याचा दर किती?

भारतात 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 81220 रुपये इतका आहे. त्याचवेळी 22 कॅरेट सोन्याचा एका ग्रॅमचा दर 74490 रुपये आहे.24 कॅरेट सोन्याच्या दरात कालच्या तुलनेत घसरण झाली आहे. तर, एक किलो चांदीचा दर 96400 रुपये किलो आहे.

मुंबईतील सोने आणि दर किती?

मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या दरात 110 रुपयांची घसरण झाली. 10 ग्रॅम सोन्याचा दर 81120 रुपये इतका आहे.  मुंबईत चांदीच्या दरात देखील घसरण पाहायला मिळाली आहे. चांदीचे दर 100 रुपयांनी घसरले असून एक किलो चांदीचा दर 96500 इतका आहे.

नवी दिल्लीत सोने आणि चांदीचा दर किती?

देशाची राजधानी नवी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 81220 रुपये इतका आहे. तर, एक किलो चांदीचा दर 96400 रुपये इतका आहे. कोलकता शहरात देखील 24 कॅरेट सोन्याचा दर 81220 रुपये इतका आहे. तर, तिथं 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 74490 रुपये इतका आहे. मुंबईदिल्लीप्रमाणं कोलकाता येथे देखील चांदीचा दर 96400 रुपये किलो आहे.

चेन्नईत चांदी महाग

भारतातील दक्षिणेकडील सर्वात महत्त्वाचं शहर म्हणजे चेन्नई होय. चेन्नईत 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा 81220 रुपये इतका आहे. तर, देशातील इतर शहरांच्या तुलनेत 1 किलो चांदीचा दर 1 लाख 3 हजार 900 रुपयांवर पोहोचले आहेत.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 5 फेब्रुवारीच्या वायद्याचे सोन्याचे दर 79523 वर पोहोचले आहेत. कालच्या तुलनेत यामध्ये वाढ झाली आहे. तर, चांदीच्या मार्चच्या वायद्याचे दर 92479 वर पोहोचले आहेत.

दरम्यान, एकीकडे शेअर बाजारात घसरण होत असल्यानं सोने आणि चांदीमधील गुंतवणुकीला गुंतवणूकदारांकडून प्राधान्य दिलं जात आहे.

इतर बातम्या :

Maharashtra :आता महाराष्ट्र थांबणार नाही! देवेंद्र फडणवीसांनी दावोसमध्ये गुंतवणुकीचं खजिना मिळवला, पहिल्याच दिवशी सहा लाख कोटींचे करार

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.