१००० रुपयांवरून ३ रुपयांवर आलेल्या Penny Stock मध्ये अचानक तुफान तेजी; बाजाराच्या हाहाकारातही अप्पर सर्किटला धडक
ET Marathi January 22, 2025 02:45 PM
मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारातील नकारात्मक संकेतामुळे मंगळवारी, २१ जानेवारी रोजी सेन्सेक्समध्ये तब्बल १००० अंकांहून अधिकची घसरण झाली. असे असतानाही या वातावरणात हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या शेअर्सने बाजारात जबरदस्त तेजी नोंदवली. बाजारातील तेजी मंदीच्या गोंधळात या कंपनीच्या शेअर्सने अप्पर सर्किटला धडक दिली. म्हणजेच ते ५ टक्क्यांनी वाढून ३.९० रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचले. सोमवारी, २० जानेवारी शेअर्स ३.७२ रुपयांवर बंद झाले होते. कंपनीच्या शेअर्सच्या वाढीमागे एक मोठी अपडेट आहे. ती म्हणजे कंपनीच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. सर्वोच्च अधिकाऱ्यांच्या राजीनाम्याबाबत माहितीHousing Development and Infrastructure ने शेअर बाजाराला सांगितले की कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) आणि CS दर्शन मजुमदार यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच, कर्ज देणाऱ्यांच्या समितीने (CoC) दर्शन मजुमदार यांनी दिलेला राजीनामा नाकारला. कंपनीचे वित्तीय अधिकारी आणि कंपनी सचिव यांना त्यांच्या पदावर कायम राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शेअर्समध्ये ९९ टक्क्यांची घसरणया वर्षी आतापर्यंत कंपनीच्या शेअर्सनी शून्य परतावा दिला असून गेल्या एका वर्षात ते ५ टक्क्यांनी घसरले आहे. तसेच, दीर्घकाळात शेअर्समध्ये ९९ टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली आहे. ११ जानेवारी २००८ रोजी या शेअरची किंमत १००० रुपयांपेक्षा जास्त होती. तेव्हापासून ते ९९ टक्क्यांहून अधिकने घसरले आहे. परंतू गेल्या काही दिवसातील कंपनीतील घडामोडींमुळे आणि या काळात शेअर ७ टक्क्यांपेक्षा जास्त वाढला आहे. कंपनी काय काम करते?एचडीआयएल म्हणून व्यवसाय करणारी हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही मुंबई येथे स्थित एक भारतीय रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी आहे.HDIL चा व्यवसाय रिअल इस्टेट डेव्हलपमेंटवर लक्ष केंद्रित करतो, ज्यामध्ये निवासी प्रकल्पांचे बांधकाम, विकास तसेच अलिकडेच व्यावसायिक आणि किरकोळ प्रकल्प, झोपडपट्टी पुनर्वसन करण्याचा सामावेश आहे.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.