Pune News: बापरे! दुसऱ्या मजल्यावरील पार्कींगमधून कार खाली कोसळली, थरारक व्हिडीओ व्हायरल
Saam TV January 22, 2025 07:45 PM

Pune Viral Video: पुणे शहरातून एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जिथे एका सोसायटीमधील गाडी पार्किंगमधून थेट खाली कोसळली आहे.घडलेली संपूर्ण घटना सोसायटीमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे.

होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता,संपूर्ण परिसर एका सोसायटीचा दिसत आहे.जिथे सोसायटीमधील अनेक मजली कार पार्किंग परिसर दिसत आहे.काही वेळाने शांत दिसणाऱ्या या व्हिडिओत पार्किंगमधून एक कार अचानक भिंत फोडून जोरदार खाली कोसळली जाते. कारचा आवाज ऐकून अनेकजण तिथे जमा होतात.सध्या(Pune) शहरातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे.

कारच्या या अपघाताचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ इन्स्टाच्या 'saamtvnews'या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे.व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''गाडी पार्किंगमधून खाली कोसळली,व्हिडिओ आला समोर''असे लिहिण्यात आलेले आहे.

व्हायरल होत असलेल्या या अपघाताचे कारण रिव्हर्स घेताना अंदाज चुकलाचे सांगण्यात येत आहे,मात्र या घटनेवरुन वाहन चालवताना किती काळजी घेतली पाहिजे याचा अंदाज येईल.ऐवढेच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी कमेटबॉक्समध्ये विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत,त्यातील एका यूजरने लिहिले आहे,''बांधकाम किती भंगार आहे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले,''रिवस गाडी भारीच ड्रायव्हर''तर अजून एका यूजरने लिहिले,''गाडीला आतमध्ये गुदमरत होते म्हणून मोकळा श्वास घ्यायला आली'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : पुणे शहरातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.