भारतीय क्रिकेट संघाने कोलकातामधील ईडन गार्डनमध्ये इंग्लंडवर पहिल्या टी 20i सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. टीम इंडियाचा ईडन गार्डनमधील सलग सातवा टी 20i विजय ठरला. टीम इंडियाने इंग्लंडकडून मिळालेलं 132 धावांचं आव्हान हे 3 विकेट्स गमावून 12.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्थी हे दोघे टीम इंडियाच्या विजयाचे हिरो ठरले. अभिषेक शर्मा याने 34 बॉलमध्ये 79 रन्स केल्या. तर त्याआधी वरुण चक्रवर्थीने याने 23 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तसेच ऑलराउंडर हार्दिक पंड्या याला बॅटिंगने फार योगदान देण्याची संधी मिळाली नाही. मात्र हार्दिकने 2 विकेट्स घेतल्या. हार्दिकने यासह वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार या दोघांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे
हार्दिकने जसप्रीत आणि भुवनेश्वर या दोघांचा टी 20i मधील विकेट्सचा रेकॉर्ड मोडला आहे. हार्दिक यासह टीम इंडियाकडून टी 20i मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. हार्दिकने इंग्लंडच्या जेकब बेथल याला आऊट करत भुवनेश्वर कुमारला मागे टाकलं. तर जोफ्रा आर्चर याला बाद करत बुमराहचा रेकॉर्ड ब्रेक केला. हार्दिकने 4 ओव्हरमध्ये 10.50 च्या इकॉनॉमीने 42 धावा दिल्या.
दरम्यान याच सामन्यात अर्शदीप सिंह यानेही 2 विकेट्स घेतल्या. अर्शदीप यासह टी 20i मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा पहिला भारतीय ठरला. अर्शदीपने युझवेंद्र चहल याचा रेकॉर्ड ब्रेक केला.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), बेन डकेट, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, गस अॅटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वूड.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती.