Maharashtra Marathi Breaking News Live Today: Jalgaon Accident महाराष्ट्रातील जळगावमध्ये एक मोठा अपघात झाला आहे. येथील परांडा स्थानकावर पुष्पक एक्सप्रेस ट्रेनमध्ये आग लागल्याची अफवा पसरली. यानंतर अनेक घाबरलेल्या प्रवाशांनी चालत्या ट्रेनमधून उड्या मारल्या, ज्यामुळे प्रवाशांना दुसऱ्या ट्रॅकवरून जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने धडक दिली. अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पक एक्सप्रेसमधून सुमारे ३५ ते ४० प्रवाशांनी उड्या मारल्या आहेत. पुष्पक एक्सप्रेस लखनौहून मुंबईला जात असताना अचानक आग लागल्याची अफवा पसरली. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्यावर चाकूने हल्ला झाला. त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांना काल रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. रुग्णालयातून बाहेर पडल्याचा व्हिडिओ जारी करण्यात आला त्यात सैफ एकदम फिट दिसले. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. सैफ यांना गंभीर दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.मात्र व्हिडिओ मध्ये ते एकदम फिट दिसले.
बीडच्या न्यायालयाने वाल्मिक कराड यांना खंडणी अणि मकोका प्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठड़ी सुनावण्यात आली आहे.
सध्या राज्यात बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांविरोधात तीव्र कारवाई केली जात आहे. मुंबईतील मुख्य न्यायदंडाधिकारीच्या 8 व्या न्यायालयाने तीन बांग्लादेशी नागरिकांना भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्या बद्दल आणि बनावट कागदपत्रांसह वास्तव्य केल्या प्रकरणी दोषी ठरवले आहे. न्यायालयाने तिन्ही बांगलादेशी नागरिकांना कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे अतिरिक्त न्यायदंडाधिकारी कांचन झवंर यांनी निकाल दिला.
सागरी प्राण्यांना पकडणे आणि त्यांची तस्करी करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. या वर पोलिसांची नजर सतत आहे. दरम्यान बुधवारी ठाणे पोलिसांनी व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस )जप्त केली आहे.या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याच्या कडून 5 कोटी रुपयांच्या क़ीमतीचे अंबरग्रीस जप्त करण्यात आले आहे.
पुण्याच्या विमान नगर भागात एका बहुमजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पार्किंग केलेली कार खाली कोसळली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. पार्किंगची भींत कोसळून हे वाहन खाली पडले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नाशिकमधील पंचवटी परिसरातील एका गृहनिर्माण संस्थेत पार्किंगच्या वादातून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. बुधन लक्ष्मण विश्वकर्मा (49) असे पीडितेचे नाव आहे.
कर्करोग हा आजही असाध्य आजार मानला जातो. कुटुंबातील सदस्य कॅन्सरच्या उपचारासाठी खूप मदत करतात. कॅन्सरच्या उपचारासाठी लोकांना मुंबईची धाव घ्यावी लगते. ज्यामुळे त्यांच्या वेळ आणि पैशासह त्यांची मानसिक स्थिती बिघडते. मात्र आता कॅन्सरच्या उपचारासाठी मुंबईला जाण्याची गरज भासणार नाही. टाटा चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रयत्नातून लातूरमध्ये कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Jalgaon Accident महाराष्ट्रातील जळगावमध्ये एक मोठा अपघात झाला आहे. येथील परांडा स्थानकावर पुष्पक एक्सप्रेस ट्रेनमध्ये आग लागल्याची अफवा पसरली. यानंतर अनेक घाबरलेल्या प्रवाशांनी चालत्या ट्रेनमधून उड्या मारल्या, ज्यामुळे प्रवाशांना दुसऱ्या ट्रॅकवरून जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने धडक दिली. अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पक एक्सप्रेसमधून सुमारे ३५ ते ४० प्रवाशांनी उड्या मारल्या आहेत. पुष्पक एक्सप्रेस लखनौहून मुंबईला जात असताना अचानक आग लागल्याची अफवा पसरली. ...