Mumbai: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ३० जानेवारी रोजी मुंबईत राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या वेळी पक्षप्रमुख राज ठाकरे संबोधित करणार आहेत.
वरळीच्या एनएससीआय डोम येथे होणाऱ्या या मेळाव्याला राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रातील गटप्रमुख तसेच सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.