बस्तरमधील सुरक्षा छावणी उघडल्यानंतर नक्षलगडमधील १४ ठिकाणी तिरंगा फडकवण्यात आला ही ठिकाणे सात जिल्ह्यांचा समावेश असलेल्या प्रदेशातील विजापूर, नारायणपूर आणि सुकमा जिल्ह्यांमध्ये आहेत या भागात सुरक्षा दलांच्या नवीन छावण्या स्थापन केल्याने या भागांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे
Minister Chandrakant Patil : मंत्री चंद्रकांत पाटील यांची 'मिनी सरस २०२५' प्रदर्शनास भेट, महिला सक्षमीकरणासाठी निधी उपलब्ध करणार-कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आयोजित 'मिनी सरस २०२५' प्रदर्शन व विक्री केंद्रास आज भेट दिली.
- आगामी काळात महिला सक्षमीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून निधी उपलब्ध करून देऊ- मंत्री चंद्रकांत पाटील
Pune : पुणे पालिकेच्या माजी अध्यक्षाकडून एकाला मारहाणपुणे पालिकेच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षाकडून एकाला मारहाण करण्यात आली. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Beed Live : "कराड ठणठणीत आणि डॉक्टरांचे त्याच्याशी जवळचे संबंध" - अंजली दमानियावाल्मिक कराड हा ठणठणीत असून त्याला काहीही न झाल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेविका अंजली दमानिया यांनी केला आहे. तर वाल्मिकवर उपचार करणारे डॉक्टर अशोक थोरात त्याच्या ओळखीचे असल्याचं त्यांनी म्हटलं.
योगेश कदम यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दापोली बस आगारात ८ नवीन एस टी बसेसचे उद्घाटनराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दापोली बस आगारात ८ नवीन एस टी बसेसचे उद्घाटन करण्यात आले
जगमित्र कार्यालयाची सूत्र अजय मुंडेंच्या हातीवाल्मिक कराड जेलमध्ये असल्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयाची सूत्र अजय मुंडे यांच्या हाती देण्यात आलेली आहेत.
एक आरोपी सापडेल असं वाटत नाही- संदीप क्षीरसागरसंतोष देशमुख खून प्रकरणातला उर्वरित एक आरोपी सापडेल असं वाटत नाही, असं आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले आहेत.
अंजली दमानिया यांच्या भेटीला धनंजय देशमुखमस्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची भेट घेतली.
Walmik Karad : वाल्मीक कराडची मालमत्ता जप्त करण्यासाठी एसआयटीच्या हालचाली सुरूवाल्मीक कराडची मालमत्ता जप्त करण्यासाठी एसआयटीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
Mumbai Live : प्रजासत्ताक दिनी मुंबईकरांसाठी एक मोठी भेट : एकनाथ शिंदेमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "येथे ७० हेक्टरचा पार्क उभारण्यात येणार आहे. महालक्ष्मी रेसकोर्सच्या १२० एकर जागेची फाईल उघडली आहे, करार झाला आहे... विशेष बाब म्हणजे ए. 300 एकरचे जागतिक दर्जाचे सेंट्रल पार्क, मुंबईकरांना लागणारा मोठा ऑक्सिजन पार्क यामुळे मुंबईचे प्रदूषण कमी होणार आहे. प्रजासत्ताक दिनी आपल्या मुंबईकरांसाठी ही एक मोठी भेट आहे..."
नाशिकमध्ये पालकमंत्रीपदाचा तिढा कायम आहे. दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
News Delhi Live : पंतप्रधान मोदींकडून वीर योद्ध्यांना नमनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीर योद्धांच्या स्मारकावर पुष्पचक्र वाहिले आणि त्यांना नमन केले.
New Delhi Live : कर्तव्यपथावर भारतीय सैन्याचे पथ संचलनदिल्लीतील कर्तव्यपथावर भारतीय सैन्याची परेड पार पडत आहेत. यात डोळ्याची पारणे फेडणारे चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहायला मिळत आहेत.
Pune Live : पुण्यातील शिवाजीनगर पोलिस मैदानावर अजित पवार यांच्या उपस्थितीत पथ संचलनदेशभरात 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत आहे. दरम्यान पुण्यात पालकमंत्री अजित पवार यांनी ध्वजारोहन केलं. शिवाजीनगर पोलिस मैदानवर अजित पवार यांच्या उपस्थितीत संचलन करण्यात आलं.
Navi Mumbai: ईस्कॉन मंदीराला वाहतूक पोलिसांची नोटीसखारघर येथे उभारण्यात आलेल्या इस्कॉनच्या राधा मदन मोहन मंदिराला खारघर वाहतूक पोलिसांनी नोटीस दिली आहे. मंदिरात दर्शन घेण्यासाठी येणाऱ्यांची वाहने गोल्फ कोर्ससमोरील रस्त्यावरील प्रवेशद्वारावर उभी राहत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाने गोल्फ कोर्स रस्त्यावरील प्रवेशद्वाराचा वापर करण्याऐवजी सेंट्रल पार्क उद्यानासमोरील मुख्य प्रवेशद्वाराचा वापर करण्याची विनंती पोलिसांनी केली आहे.
Pune Live: पुण्यातील GBS बाधित रुग्णाचा मृत्यूपुण्यातील GBS बाधित रुग्णाचा मृत्यू
पुण्यातील DSK विश्व मध्ये राहणाऱ्या तरुणाचा GBS ची लागण झाल्याने मृत्यू
मूळचा सोलापूर जिल्ह्यातील असणारा तरुण पुण्यातील धायरी परिसरात असणाऱ्या डीएसके विश्व या ठिकाणी वास्तव्यास होता
Pune: महापालिकाही गरीब रुग्णांच्या जी बी एस उपचाराचा खर्चात देणार योगदानआता पुणे महापालिकाही गरीब रुग्णांच्या जी बी एस उपचाराचा खर्चात देणार योगदान
या आजाराचे उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर
आजाराचा रुग्ण छोट्या रुग्णालयात उपचारांचा खर्च सुमारे ५ ते ६ लाखांवर तर हाच खर्च मध्यम आणि मोठ्या रुग्णालयात १० लाखांपर्यंत
यामुळे महापालिकेने गरीब रुग्णांच्या उपचाराच्या खर्चात आर्थिक योगदान देण्याचा निर्णय
जीबीएस ची रुग्णसंख्या ७३ वर पोहोचली असून, त्यातील १४ व्हेंटिलेटर वर
Nagpur Live: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात थोड्याच वेळात ध्वजारोहणराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ मुख्यालयात थोड्याच वेळात ध्वजारोहण होईल
महानगर संघचालक राजेश लोया यांच्या हस्ते ध्वजवंदन होईल....
यावेळी शाखेतील पदाधिकारी सुरक्षारक्षक तसेच गणमान्य नागरिक उपस्थित असेल.. फ्रेम दिली आहे.