Mahakumbh Mela Stampede LIVE Updates : 'स्थानिक' निवडणुकीसाठी कामाला लागा, अजित पवारांच्या आमदारांना सूचना
Sarkarnama January 30, 2025 03:45 PM
Ajit Pawar News : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी कामाला लागा, अजित पवारांच्या आमदारांना सूचना

अजित पवारांच्या सगळ्या आमदारांना सूचना. तुमच्या अडचणी असतील तर थेट माझ्याशी बोला. ज्या ठिकाणी आपले स्थानिक आमदार आहेत. तिथल्या घटक पक्षांना विचारात घेवून काम करा. आपापल्या जिल्ह्यात पक्ष वाढीच काम करायचं आहे. पुढच्या काळात पक्ष संघटना मजबूत झाली पाहिजे. अनेक लोकांना पक्षात यायचं आहे. चांगल्या लोकांना पक्षात घ्या, पक्षाचं काम लोकांपर्यंत गेल पाहिजे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कामाला लागा. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी ही लागतील मात्र महायुती म्हणूनच एकत्रित काम करा. अशा सुचना अजित पवार यांनी दिल्या आहेत.

Sanjay Raut on Mahakunbh 2025 : संजय राऊत यांनी उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधला

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत म्हणाले, 'यूपी सरकार फक्त कुंभमेळ्याच्या मार्केटिंगवर लक्ष केंद्रित करत होते. भाविकांच्या सुविधांसाठी योग्य व्यवस्था करण्यात आली नव्हती. गृहमंत्री आणि संरक्षणमंत्री स्नानासाठी गेले तेव्हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला होता, ज्यामुळे सामान्य भाविकांना त्रास होत होता. यूपीचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांनी पक्षाचा प्रचार करण्याऐवजी भाविकांच्या व्यवस्थेकडे लक्ष द्यायला हवे होते.

Dhananjay Munde Latest Update : मुंडेंवर राजकीय दबाव वाढला; राजीनामाचा निर्णय दिल्ली दरबारी?

राजकीय गोटातून महत्त्वातची अपडेट समोर येत आहे. वाल्मिक कराड प्रकरणावरून अन्न व पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढताना दिसतोय. याच पार्श्वभूमीवर मुंडे दिल्ली दौऱ्यावर गेलेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यामुळे राजीनामाचा निर्णय दिल्ली दरबारी गेलाय का असे तर्कवितर्क लावले जात आहेत.  

GB Syndrome Latest Update : राज्यात जीबीएसचा पहिला बळी, केंद्र सरकार अलर्ट मोडवर

राज्यात जीबीएसचा पहिला बळी, केंद्राच 7 तज्ञांच पथक पुण्यात दाखल. पुण्यातील नांदेड गावातील विहिरीची पाहणी करणार.

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख यांच्या हत्येला 50 दिवस, तरी एक आरोपी फरारच

बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हदरून केला आहे. आज या हत्येच्या घटनेला 50 दिवस झाले असून अजूनही एक आरोपी फरारच आहे. देशमुख कुटुंबाला न्याय कधी मिळणार? असा सवाल विचारण्यात येत आहे.

पुणेकरांना दर वाढीचा झटका, आता पीएमपीएलची तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता

इंधनाचे वाढते दर, वाहनांच्या सुट्या भागाच्या वाढत्या किमती आणि कर्मचाऱ्यांची झालेली पगारवाढ यामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाची संचलन तूट २०१६-१७ च्या तुलनेत २०२३-२४ मध्ये तब्बल ४९६.४४ कोटींनी वाढ झाली आहे.

Prakash Awade Live: माजी आमदारानं कंपनीचे कुलुप तोडले; काय घडलं

कोल्हापुरातील इचलकरंजीतील माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी एका कंपनी कर्मचाऱ्यांना दमदाटी करीत कंपनीचे कुलूप तोडले. जुनी वसुली करण्यासाठी त्यांनी कुलुप तोडल्याची माहिती आहे. याबाबतचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल होत आहे. गुंतवणूक न केलेली रक्कम परत न मिळाल्याने प्रकाश आवाडे मील मध्ये घुसले होते, अशी प्राथमिक माहिती आहे.

Mahakumbh 2025 live: हेमा मालिनी यांनी केलं शाही स्नान

प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात आज मौनी अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर स्नान करण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली आहे. आज पहाटे सुमारे दीड वाजण्याच्या सुमारात महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली, यात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेच्या काही तासानंतर भाजपच्या खासदार, ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी शाही स्नान केले.

Mahakumbh Stampede : महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा वाढला

महाकुंभमेळ्यात संगम किनाऱ्याजवळ झालेल्या चेंगराचेंगरी आतापर्यंत 17 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढल्याचं पाहायला मिळत आहे. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपाचर सुरू आहेत. तर या ठिकाणी प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना करत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शिवाय आजचं शाही स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Mahakumbh Stampede Updates : महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी अनेकांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील कुंभमेळ्यात मौनी अमावस्येनिमित्त मोठी गर्दी झाली आहे. याच गर्दीमुळे मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास संगम किणाऱ्याजवळ चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत दहाहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर प्रयागराजमधील गर्दी पाहता आखाडा परिषदेनं अमावस्येनिमित्त होणारं अमृतस्नान रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संवाद साधत घटनेची माहिती घेतली आहे. तसंच जखमींना तत्काळ मदत करण्याचे निर्देश देखील दिले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.