Latest Maharashtra News Updates : जीबी सिंड्रोमचा आणखी एक रुग्ण कोल्हापूरच्या सीपीआरमध्ये दाखल, रुग्णांची संख्या झाली तीन
esakal January 31, 2025 01:45 PM
Budget Session LIVE : २०२५-२६ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू

२०२५-२६ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. अर्थमंत्री दुपारी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करणार आहेत.

जीबी सिंड्रोमचा आणखी एक रुग्ण कोल्हापूरच्या सीपीआरमध्ये दाखल, रुग्णांची संख्या झाली तीन

कोल्हापूर : सीपीआर रुग्णालयात जीबी सिंड्रोमचे दोन रुग्ण उपचार घेत असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. अशात आज आणखी एक बालक रुग्ण दाखल झाला असून, त्याच्यावर रात्री तपासणी व उपचार सुरू होते. मात्र, त्या रुग्णास जीबी सिंड्रोम झाल्याचे अंतिम निदान झाले. त्यामुळे सीपीआरमध्ये उपचार घेणाऱ्या जीबी सिंड्रोम रुग्णांची संख्या तीन झाली आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. शिशीर मिरंगुडे यांनी दिली. कर्नाटकातील एक ७० वर्षांचे वृध्द व मूळ झारखंडची सध्या हातकंगणले येथे राहणारी एक १२ वर्षीय मुलगी, असे दोन रुग्ण सध्या सीपीआरमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तर काल सायंकाळी वसगडे (ता. करवीर) येथील ११ वर्षीय मुलगा सीपीआरमध्ये उपचारासाठी आला. तपासण्या तसेच लक्षणावरून त्याला जीबी सिंड्रोमचे निदान झाले असून, त्याच्यावर सीपीआरच्या बालरोगतज्ज्ञांकडून उपचार सुरू आहेत, त्याची प्रकृती स्थिर आहे.

Manoj Jarange LIVE : मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं सहाव्या दिवशी बेमुदत उपोषण स्थगित

Latest Marathi Live Updates 31 January 2025 : २०२५-२६ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. अर्थमंत्री दुपारी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करणार आहेत. ‘कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सरकार लपवित आहे. तेथील विस्कळित व्यवस्थापनावर संसदेत चर्चा व्हावी,’ अशी मागणी आक्रमकपणे विरोधी पक्षांनी सर्वपक्षीय बैठकीमध्ये केली. तसेच वक्फ दुरुस्ती विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीच्या अहवालावरूनही त्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी सहाव्या दिवशी बेमुदत उपोषण स्थगित केले. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. सीपीआर रुग्णालयात जीबी सिंड्रोमचे दोन रुग्ण उपचार घेत असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. अशात आणखी एक बालक रुग्ण दाखल झाला असून, त्याच्यावर रात्री तपासणी व उपचार सुरू होते. त्याचबरोबर राज्यात काही ठिकाणी थंडीचा कडाका आहे तर, काही भागांत थंडी कमी झालेली दिसत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.