बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती स्पष्टवक्ता म्हणून ओळखली जाते. सध्या स्वरा भास्कर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री स्वरा भास्करचे एक्स अकाऊंट कायमचे बंद करण्यात आले आहे. हा बातमी अभिनेत्रीने स्वतः इन्स्टाग्रामवर पोस्ट करून चाहत्यांना दिली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या स्वरा भास्करची चर्चा रंगली आहे.
अभिनेत्री भास्करने दिलेल्या माहितीनुसार, 26 जानेवारी आणि 30 जानेवारीला केलेल्या पोस्टमुळे स्वरा भास्करचे एक्स अकाऊंट कायमचे बंद करण्यात आले आहे. तिने शेअर केलेल्या महात्मा गांधींचा फोटो आणि तिरंग्यासोबत मुलीचा फोटो यावर लावण्यात आले आहे. कॉपीराईटचे उल्लंघन केल्याचा दावा करण्यात आला असल्यामुळे स्वराचे एक्स अकाऊंट बंद करण्यात आले आहे.
स्वरा भास्करने शेअर केलेल्या पोस्टमध्ये एकंदर असे म्हटले आहे की, मला दोन फोटोंना कॉपीराईट उल्लंघन केल्याचे आले होते. त्यानंतर अकाऊंट कायमचे बंद करण्यात आले आहे. स्वराने एक पोस्ट 26 जानेवारीला तर दुसरी पोस्ट 30 जानेवारीला केली होती. स्वराने 26 जानेवारीला हातात तिरंगा घेतलेल्या आपल्या मुलाचा आणि 30 जानेवारीला "गांधी हम शर्मिंदा हैं, तेरे कातिल अभी जिंदा हैं" अशा टेक्स्टची पोस्ट केली होती. या दोन्ही पोस्टवर कॉपीराईट आला आहे.
एक्सने थेट अकाऊंट बंद केल्यामुळे अभिनेत्री स्वरा भास्करने नाराजी व्यक्त केली आहे. तिने लिहिलं आहे की, गांधीजींच्या पोस्टमध्ये जो नारा लिहिला आहे तो प्रगतीशील आंदोलनाचा आहे. यात कॉपीराईटच्या उल्लंघन कसे झाले? तसेच दुसरा फोटो माझ्या स्वतःच्या मुलाचा असून मी चेहरा देखील लपवला आहे. माझ्या मुलीच्या फोटोवर कोणाचा कॉपीराइट आहे? असे प्रश्न तिने केले आहेत.
स्वरा भास्करने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये एक्स अकाऊंटवर केलेल्या दोन्ही पोस्टचे स्क्रीनशॉट देखील टाकले आहेत. शेवटी स्वराने पोस्टमध्ये म्हटले की, "या ट्विटना मास रिपोर्ट करण्यात आले आहे. मला त्रास देण्याचा हा प्रयत्न आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपण्याचा उद्देश आहे. एक्सने कृपया याची नोंद घ्यावी आणि आपला निर्णय बदलावा."