Maharashtra Political News live : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण सुरु
Sarkarnama January 31, 2025 06:45 PM
Budget 2025 Economic Survey : मुर्मूंनी मांडला मोदी सरकारचा रिपोर्ट कार्ड

राष्ट्रपती म्हणाले की स्वयंरोजगार, ई-कॉमर्स, कर्ज आणि मुद्रा कर्जाचे फायदे कोट्यवधी लोकांना मिळाले आहेत. कर्ज, क्रेडिट कार्ड आणि विमा सहज उपलब्ध आहेत. रस्त्यावरील विक्रेत्यांना बँकिंग व्यवस्थेशी जोडले गेले आहे आणि त्यांना स्वानिधी योजनेचे फायदे मिळत आहेत.

President Murmu live : ३ कोटी 'लखपती दीदी' तयार करण्याचे लक्ष्य

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महिला सक्षमीकरणासाठी सरकारच्या धोरणावर भर दिला, ३ कोटी 'लखपती दीदी' तयार करण्याची योजना आखली.

President Droupadi Murmu live : मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात तीन पट वेगाने काम सुरू आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात तीन पट वेगाने काम केले जात आहे. 'एक राष्ट्र एक निवडणूक' उपक्रम राबविण्याच्या आणि वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर असे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहे.

President Droupadi Murmu live : दौपदी मुर्मू यांनी महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल दुखः व्यक्त केले आहे. Budget Session 2025 LIVE : राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात सांगितले- देश जलद गतीने निर्णय घेत आहे. Pune Live : देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात विश्व मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात आज देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विश्व मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन. काल रात्रीपासून देवेंद्र फडणवीस पुण्यातील सर्किट हाऊस येथे मुक्कामी. तर दुपारी फडणवीस यांच्या हस्ते पुण्यात भाजप सदस्य नोंदणी अभियान

Budget 2025 Session LIVE : थोड्याच वेळात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारपासून सुरु होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. तर उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

Budget session 2025: भारत सध्या मिशन मोडमध्येः नरेंद्र मोदी

भारत सध्या मिशन मोडमध्ये आहे, 2047 मध्ये विकसिक झालेला देश असेल, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध विषयावर चर्चा होईल, असे मोदी म्हणाले. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. अधिवेशनात मोदींनी माध्यामाशी संवाद साधला.

Pune Politics: एकाच सर्किट हाऊसवर मुक्कामी; पण फडणवीस-भुजबळांची भेटणं टाळलं?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल (गुरुवारी) रात्री पुण्यातील सर्किट हाऊस येथे मुक्कामी होते.पण दोन्ही नेत्यांमध्ये भेट होऊ शकली नाही. छगन भुजबळ एका नियोजित कार्यक्रमाला जात असताना त्यांना तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार का विचारलं असता भुजबळ म्हणाले की "मी काल मुक्कामी होतो मुख्यमंत्री साहेब रात्री तीन वाजता आले आहेत मला नियोजित कार्यक्रमासाठी निघायचं आहे वेळ होत आहे. त्यामुळे आता तरी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार नाही" एवढं बोलून छगन भुजबळ त्यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी पुण्यातील सर्किट हाऊस मधून रवाना झाले.

Namdev Shastri live: नामदेव शास्त्री यांनी मुंडेंची पाठराखण

संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांचे निकटवर्तीय असलेले मंत्री धनंजय मुंडे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत, त्यांनी भगवान गड येथे नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. दोन-अडीच तास त्यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर मुंडे यांच्या पाठीशी भगवान गड ठामपणा उभा आहे, असे सांगत नामदेव शास्त्री यांनी मुंडेंची पाठराखण केली. धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे, असे नामदेव शास्त्री म्हणाले.

Mumbai Metro : मेट्रोचं अर्थवट बांधकाम कोसळलं

मुंबईच्या चेंबूर भागात वडाळ्याकडे जाणाऱ्या मेट्रोचं अर्थवट बांधकाम कोसळल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. हे बांधकाम सोसायटीच्या रहिवासी परिसरात कोसळलं असून यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

Guillain-Barre Syndrome : पुण्यात 24 तासांत जीबी सिंड्रोमचा एकही रुग्ण नाही

पुण्यात गेल्या 24 तासांत एक ही GBS रुग्णाची नोंद झाली नाही. तर पुण्यातील जीबीएस रुग्णांची संख्या 130 वर स्थिर झाली आहे. त्यामुळे पुणेकरांना काहिसा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे.

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त युवासेना 'कॉमन मॅन दिन' साजरा करणार

शिवसेना (शिंदे गट) प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त युवासेनेतर्फे रविवारी (ता.9) राज्यभरात ‘कॉमन मॅन दिन’ साजरा करण्यात येणार आहे. या माध्यमातून राज्यातील 36 जिल्ह्यातील प्रत्येकी 61 सर्वसामान्य नागरिकांचा युवासेनेतर्फे सन्मान करण्यात येणार आहे.

Buldhana : बुलढाणा केस गळती प्रकरणचा ICMR चा अहवाल प्राप्त होणार

बुलढाण्यातील शेगांव केस गळती प्रकरणात ICMRचा अहवाल प्राप्त होणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे. सध्या नागपूर एम्सची टीम शेगाव तालुक्यात विविध गावांमध्ये सर्व्हे करत आहे. येथील नागरिकांना केस गळती होऊन टक्कल पडल्याच्या समस्येनंतर आता डोळ्यांची समस्या उद्भवल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. तर या आजाराचे निदान झाल्यानंतरच योग्य ते औषध उपचार केले जातील असं सांगण्यात येत आहे.

Budget session 2025 : संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारपासून सुरु होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. तर उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

BMC Budget 2025 : BMC बजेट 3 फेब्रुवारी रोजी सादर होणार

मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 3 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. आयुक्त आणि प्रशासक म्हणून भूषण गगराणी पहिल्यांदाच हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आगामी मुंबई महापालिका अर्थसंकल्पात पर्यावरण, प्रदूषण आणि बेस्टसाठी ठोस उपाययोजना करण्याची शक्यता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.