टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात 31 जानेवारीला पुण्यात झालेल्या चौथ्या टी 20I सामन्यात इंग्लंडवर 15 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशा फरकाने विजय मिळवला. टीम इंडियाने हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे या ऑलराउंडर जोडीने केलेल्या विस्फोटक अर्धशतकाच्या जोरावर 180 पार मजल मारली. हार्दिक आणि शिवम यादोघांनी प्रत्येकी 53 धावा केल्या. दोघांनी केलेल्या या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 181 धावा केल्या. तर विजयी धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचं 166 धावांवर पॅकअप झालं. शिवमला 53 धावांच्या स्फोटक खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. तर हार्दिकने या खेळीसह विराट कोहलीचा मोठा रेकॉर्ड ब्रेक केला.
इंग्लंडने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. इंग्लंडच्या साकीब महमूद याने टीम इंडियाला एकाच ओव्हरमध्ये 3 झटके दिले. त्यानंतर अभिषेक शर्मा आऊट झाला. टीम इंडियाने रिंकु सिंह याच्या रुपात पाचवी विकेट गमावली. त्यामुळे टीम इंडियाची 5 बाद 79 अशी नाजूक स्थिती झाली होती. मात्र त्यानंतर हार्दिक आणि शिवम या जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांना बॅटिंगने चांगलाच चोप दिला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 87 धावांची निर्णायक भागीदारी केली. त्यानंतर हार्दिक आऊट झाला.
हार्दिकने 30 बॉलमध्ये 53 धावा केल्या. हार्दिकने अवघ्या चौकार आणि षटकारांच्या मदतीने 40 धावा केल्या. हार्दिकने 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने एकूण 8 चेंडूत 40 धावा केल्या. हार्दिक 18 व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर आऊट झाला. मात्र त्याने विराटचा रेकॉर्ड ब्रेक केला.
हार्दिक टी 20I क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी डेथ ओव्हरमध्ये (16-20) सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. हार्दिकने याबाबत विराटला मागे टाकलं आहे. विराटने या टी 20I क्रिकेटमध्ये डेथ ओव्हरमध्ये 1 हजार 32 धावा केल्या आहेत. तर हार्दिकच्या नावावर आता 1 हजार 68 धावांची नोंद आहे.
हार्दिकचा इंग्लंडला दणका
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा (कनकशन सब्स्टीट्यूट)
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि साकिब महमूद.